कर्णधार-उपकर्णधारानं मुंबईत घेतला लशीचा पहिला डोस

Virat Kohli
Virat KohliInstagram

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 5 कसोटी सामन्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. कोहली सध्या मुंबईत असून इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत त्याने सोमवारी लशीचा पहिला डोस घेतल्याची माहिती दिलीये. दुसरीकडे ईशांत शर्माने देखील लशीचा पहिला डोस घेतल्याची माहिती ट्विटरवरुन फोटो पोस्ट करत शेअर केलीये. ईशांतसोबत त्याची पत्नी प्रतिमा देखील लसीकरण केंद्रावर गेल्याचे पाहायला मिळाले.

Virat Kohli
BCCI चा स्थानिक खेळाडूंना दिलासा; IPL पुन्हा देशाबाहेर?

ईशांतने शर्माने ट्विटरवरुन पत्नी प्रतिभासोबतचा फोटो शेअर करत लस घेतल्याची माहिती दिलीये. लसीकरण मोहिमेत काम करत असलेल्या सर्वांचे आभार. केंद्रावर चांगली व्यवस्था आहे. सर्वांनी उपलब्धतेनुसार लस घ्यावी, असे आवाहन ईशांत शर्माने केले. विराट आणि ईशांत शर्मापूर्वी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि जलदगती गोलंदाज उमेश यादव यांनी लस घेतली होती. शिखर धवन हा कोरोनाची लस घेणारा पहिला क्रिकेटर आहे.

Virat Kohli
धवनने टोचून घेतली लस; फोटो शेअर करत देशवासियांना केलं आवाहन

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. साडे तीन महिन्याच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघातील खेळाडू कोरोनाची लस घेत आहेत. याशिवाय देशवासियांना लस घेण्याचे आवाहनही केले आहे. आयपीएल दरम्यानच खेळाडूंना कोरोनाची लस देण्याचा प्लॅन बीसीसीआयने आखला होता. मात्र कोरोनाच्या केसेस आढळल्यामुळे स्पर्धा निम्म्यावर स्थगित करण्यात आली. घरी परतलेल्या खेळाडूंनी स्वत:हून लस घेणे योग्य ठरेल असे म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com