विराटची 'जोकर'वाली स्माईल; वेदना सांगणारा VIDEO व्हायरल

विराट कोहली गर्दीकडे पाहून हसत राहिला. जणू काही चाहत्यांना सर्वकाही ठीक होईल हे सांगण्याचा प्रयत्न करत होता.
virat kohli joker smile video hollywood film joker actor joaquin phoenix watch video ind vs eng
virat kohli joker smile video hollywood film joker actor joaquin phoenix watch video ind vs eng sakal

Virat Kohli Joker Smile Video : विराट कोहली हे नाव घेताच गोलंदाजांच्या मनात दहशत निर्माण व्हायची या किंग कोहलीची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नाहीत त्यामुळे ट्रोलर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत. ट्रोलर्स तर सोडा आता क्रिकेटपंडितांचाही विराट कोहलीवरचा विश्वास जवळजवळ पूर्णपणे उडाला आहे. विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी होत आहे. पण दुसऱ्या टी-20 सामन्यात मैदानावर जे काही दिसल, त्याने मनात घर केलं.

virat kohli joker smile video hollywood film joker actor joaquin phoenix watch video ind vs eng
आता सेहवागने सुद्धा केलं ट्विट, कोहलीसाठी वाजली धोक्याची 'घंटा'

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दुसरा टी-20 सामन्यात विराट 3 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. किंग कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला चेहऱ्यावर निराशा दिसत होती. जेव्हा विराटने भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर दोन्ही हातांनी स्मितहास्य दाखवले तेव्हा त्यामागची वेदना विराटच्या सर्व चाहत्यांना दिसत होती. पण विराट कोहली गर्दीकडे पाहून हसत राहिला. जणू काही किंग कोहली चाहत्यांना सर्वकाही ठीक होईल हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. विराटचे हे स्मित हॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध जोकर पात्र आर्थर फ्लेक म्हणजेच हिरो वॉकिन फिनिक्सच्या प्रसिद्ध हास्याशी जोडले जात आहे.

मालिकेतील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विराटला विश्रांती देण्यात आली होती, मात्र या विश्रांतीनंतर परतल्यावर त्याची लय काय आली नाही. यानंतर विराटने तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 6 चेंडूत 11 धावा केल्या. विराटच्या संघातील निवडीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी कर्णधार कपिल देव म्हणाले की, विराट केवळ नावाच्या जोरावर संघात राहू शकत नाही, त्यालाही चांगला फॉर्म दाखवावा लागेल. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने विराटचा बचाव करताना सांगितले की, विराटसारख्या खेळाडूला न्याय देण्यासाठी आम्ही एक-दोन मालिका किंवा आठ-दहा सामन्यांवर अवलंबून राहू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com