INDvWI : कसाही असो आम्हाला पंतच हवा; संधी न देताच सॅमसनला डच्चू!

Team-India-vs-WI
Team-India-vs-WI

कोलकाता : वेस्ट इंडीजविरुदधच्या मर्यादित षटकांच्या (50-50 आणि ट्‌वेन्टी-20) मालिकांसाठी शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला, मात्र त्याच वेळी एकही सामना न खेळवता यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला मात्र डच्चू देण्यात आला. 

पुढील महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ भारतात तीन ेट्‌न्टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. आता कसोटी क्रिकेटमध्येही खेळत असलेल्या रोहित शर्माला विश्रांती दिली जाईल अशी शक्‍यता होती, परंतु रोहित या दोन्ही मालिकांमध्ये खेळणार आहे. 

शमी, भुवनेश्‍वरचे पुनरागमन 

जसप्रित बुमरा अजूनही तंदुरुस्त नसल्यामुळे इतर पर्याय गेल्या काही मालिकांमधून तपासल्यानंतर निवड समितीने महम्मद शमी आणि भुवनेश्‍वर कुमार यांना पुनरागमनाची संधी देवून वेगवान गोलंदाज भक्कम केली आहे. भुवनेश्‍वर कुमार दुखापतीनंतर संघात परतत आहे. दीपक चहर या तिसरा वेगवान गोलंदाज असेल. 

कृणाल पंड्याला वगळले 

दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत सपशेल अपयशी ठरलेल्या कृणाल पंड्याला वगळण्यात आले असून त्याच्या ठिकाणी कुलदीप यादवची निवड करण्यात आली. त्याचबरोबर रवींद्र जडेजालाही पुनरागमनाची संधी देण्यात आली. 

पंत कायम सॅमसनला वगळले 

सातत्याने अपयशी ठरत असला तरी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र त्याला पर्याय म्हणून बागलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंच्या संघात निवडलेला परंतु एकही सामना खेळण्याची संधी न दिलेल्या सॅमसनला मात्र वगळण्याचा निर्णय एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने घेतला आहे. 

ट्‌वेन्टी-20 मालिका : 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक) शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, महम्मद शमी आणि भुवनेश्‍वर कुमार. 

एकदिवसीय मालिका : 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, महम्मद शमी आणि भुवनेश्‍वर कुमार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com