INDvsWI : विराटला दुखापत; सराव सामन्यात विश्रांतीची शक्यता

वृत्तसंस्था
Saturday, 17 August 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 22 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी 17 ऑगस्टपासून दोन्ही संघात तीन दिवसांचा सराव सामना खेळविला जाणार आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे या सराव सामन्यातून माघार घेणार आहे.  

गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 22 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी 17 ऑगस्टपासून दोन्ही संघात तीन दिवसांचा सराव सामना खेळविला जाणार आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे या सराव सामन्यातून माघार घेणार आहे.  

कोहलीच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो तीन दिवसांच्या सराव सामन्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाईल. 

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाबरोबर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, जसप्रित बुमरा, रविचंद्रन अश्विन हे सारे वरिष्ठ खेळाडू दाखल झाले आहेत. बीसीसीआयने पुजारा, अश्विन, मयांक अगरवाल, रोहित शर्मा यांच्या सरावाचे फोटो शेअर केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Likely To Miss Practice Game against West Indies