वॉटसन म्हणाला, टेस्टमधील 'बिग फाईव्ह'मध्ये कोहलीच किंग

Virat Kohli
Virat Kohli esakal

दुबई: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन (Shane Watson) याने विराट कोहली (Virat Kohli) टेस्ट क्रिकेटमधील सध्याच्या ‘बिग फाइव्ह’ च्या यादीत टॉपला ठेवलं आहे. नोव्हेंबर 2019 पासून विराट कोहलीच्या भात्यातून एकही शतकी खेळी पाहायला मिळालेली नाही. तरीही विराट कोहली हा अन्य खेळाडूंपेक्षा कितीतरी पुढे आहे, असे मत वॉटसन याने व्यक्त केले आहे. आयसीसीच्या पॉडकास्टमध्ये त्याने कोहलीला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, न्यूजीलंड कर्णधार केन विल्यमसन, आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथसह इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट कप्तान जो रूट पेक्षा अधिक गुण दिले. क्रिकेटच्या मैदानातील किंग हा सुपर ह्युमन बिंग असल्याचेही वॉटसन याने म्हटले आहे.

आयसीसीने (ICC)आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला मार्नस लाबुशेन याने 26 कसोटीत 54.31 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र तो कसोटीतील ‘बिग फाइव्ह’च्या यादीत नाही. ही निवड करताना 40 कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार करण्यात आला आहे. वॉटसन याने 33 वर्षीय कोहलीला या यादीत अव्वल असल्याचे म्हटेल आहे. बाबर आझमला दुसरे तर स्मिथ, विल्यमसन आणि रूट यांना त्याने अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान दिले आहे.

Virat Kohli
IPL 2022 : ...तर MI यंदाही Playoffs मध्ये खेळेल? हा घ्या पुरावा

अशी आहे टॉप फाइव्हमध्ये असलेल्या खेळाडूंची कामगिरी

कोहलीने 101 कसोटी सामन्यातील 171 डावात 49.95 च्या सरासरीने 8043 धावा केल्या आहेत. बाबरच्या खात्यात 40 कसोटीतील 71 डावात 45.98 च्या सरासरीने 2851 धावां जमा आहेत. ऑस्ट्रेलियन स्मिथने 85 कसोटीतील 51 डावात 8010 धावा केल्या असून त्याची सरासरी कोहलीपेक्षा अधिक 59.77 इतकी आहे. विलियमसन याने 86 कसोटीत 150 डावात 53.57 च्या सरासरीने 7272 धावा तर रूटने 117 कसोटीतील 216 डावात 49.19 च्या सरीसरीने 9889 धावा केल्या आहेत.

Virat Kohli
चेन्नईपाठोपाठ भारतीय संघाला मोठा धक्का; 2022 च्या टी20 वर्ल्डकपमधून दिपक चहर 'आऊट'

सरासरी कमी असली तरी कोहलीच बेस्ट : वॉटसन

स्मिथ आणि विल्यमसन यांची सरासरी विराट कोहलीपेक्षा अधिक असली तरी मी पहिला क्रमांक हा कोहलीली देईन, असे वॉटसन म्हणाला. इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि समोलोचक ईशा गुहाच्या प्रश्नावर वॉटसनने विराट कोहली टेस्टमध्ये कायम बेस्ट राहील, असं विधानही केलं. विराट कोहली हा सुपर ह्युमन आहे. काहीही करण्याची क्षमता त्याच्यामध्ये दिसते, असेही वॉटसन यावेळी म्हणाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com