Police Action on One8 Hotel Bangalore : विराट कोहली सहमालक असलेल्या बेंगळुरूतील One8 हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धूम्रपान क्षेत्रासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक न्यायालयाच्या परवानगीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.