कसाही खेळो, रहाणे आमचा आधारस्तंभ आहे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

अजिंक्य रहाणे आता जरी फॉर्मात नसला तरी तो आमच्या संघाचा आधारस्तंभ आहे असे म्हणत कर्णधार विराट कोहलीने कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेला पाठींबा दिला आहे. 

मुंबई : अजिंक्य रहाणे आता जरी फॉर्मात नसला तरी तो आमच्या संघाचा आधारस्तंभ आहे असे म्हणत कर्णधार विराट कोहलीने कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेला पाठींबा दिला आहे. 

कसोटी संघामध्ये उपकर्णधार असूनही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये रहाणेला संघाबाहेर बसावे लागले होते. त्या संघ निवडीवरून कोहली आणि शास्त्री यांच्यावर टीकाही झाली होती. विश्वकरंडक स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य तंत्र असलेला फलंदाज नसतानाही संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने रहाणेकडे दुर्लक्ष केले. काही तज्ज्ञांच्या मते, चौथ्या क्रमांकावर तंत्रशुद्ध फलंदाज नसण्याचाच फटका भारतीय संघाला बसला.

''दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत रहाणे खेळला नाही मात्र, सध्या तो कौंटीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा संयम त्याच्याकडे आहे. कसोटी संघात रुणी कसाही खेळलं तरी तो कधीच दडपण घेत नाही. अजिंक्य आणि पुजारा हे भारतीय संघाचे आधारस्तंभ आहेत,'' अशा शब्दांत त्याने रहाणेचे कौतुक केले. 

भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची पत्रकार परिषद झाली. भारत आणि विंडीज यांच्यात 3 ऑग्सटपासून मालिकेला सुरवात होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli praises Ajinkya Rahane ahead of West Indies tour