esakal | विराटचा नवा लूक व्हायरल; तुम्ही सांगा कुणासारखा दिसतो?
sakal

बोलून बातमी शोधा

Virat New look

सध्या विराट मुंबईतील हॉटेलमध्ये क्वॉरंटाइनमध्ये राहत आहे. १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी संपल्यानंतर भारताचा संघ इंग्लंडला रवाना होणार आहे.

विराटचा नवा लूक व्हायरल; तुम्ही सांगा कुणासारखा दिसतो?

sakal_logo
By
आशिष कदम

भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या ब्रँड व्हॅल्यू आणि फॅशनमुळे ओळखला जातो. टीम इंडियाचाच नाही तर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. याव्यतिरिक्त स्टायलिश खेळाडू म्हणूनही तो ओळखला जातो. आपल्या फिटनेस आणि लूकमुळे तो चर्चेतही असतो. आताही त्याचा नवा लूक सध्या सोशल मीडियात (Social Media) तुफान व्हायरल होऊ लागला आहे. विराट शॉर्ट हेअरकट आणि दाढीच्या नवनव्या स्टाईल करत असतो. (Virat Kohli Quarantine Look goes viral on social media)

हेही वाचा: धोनी, कोहली, डिव्हिलियर्स वापरतात ती बॅट बनते कशी?

आता व्हायरल होत असलेल्या लूक मध्ये विराटचे लांब केस आणि लांब दाढी दिसत आहे. त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना आवडला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. अनेक मीम्सही शेअर होऊ लागले आहेत. काहीजणांनी त्याची तुलना 'मनी हाइस्ट' या तुफान गाजलेल्या वेब सीरिजमधील प्रोफेसरशी केली आहे, काहीजण त्याला बॉबी देओलची कॉपी म्हणत आहेत, तर काही जणांना तो कबीर सिंगमधल्या शाहिद कपूरसारखा दिसत आहे. चाहते तसेच नेटकऱ्यांनी विराटच्या नव्या लूकवर जोरदार कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान, सध्या विराट मुंबईतील हॉटेलमध्ये क्वॉरंटाइनमध्ये राहत आहे. १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी संपल्यानंतर भारताचा संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे.

हेही वाचा: कोरोना संक्रमित मिल्खा सिंगना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट

विराट हा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक मानधन घेणार्‍या खेळाडूंमध्ये गणला जातो. २०२०च्या फोर्ब्सच्या टॉप-१०० अॅथलिट्सच्या यादीत विराट हा एकमेव भारतीय खेळाडू होता. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारामध्ये विराटचे नाव ए+ ग्रेडमध्ये आहे. यामुळे विराटला दरवर्षी ७ कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये कमाई करण्यात विराट आघाडीवर असला तरी कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात पगार मिळविण्यात तो इंग्लंड कसोटी कर्णधार ज्यो रुटच्या मागे आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या (ECB) २०२०-२१ टेस्ट करारानुसार, रूटला विराटपेक्षा जास्त मानधन मिळते.

क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image