कोहली-शास्त्रींची व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकली का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli and Ravi Shastri

कोहली-शास्त्रींची व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकली का?

ICC World Test Championship Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झालाय. इंग्लंडमधील साउथहॅम्प्टनच्या मैदानात 18 ते 22 जून दरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Virat Kohli Ravi Shastri) यांनी वर्च्युअली प्रेस कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. (Virat Kohli Ravi Shastri Audio Viral Mohammad Siraj Place Confirmed In The Final India vs New Zealand ICC World Test Championship Final)

हेही वाचा: WTC : शास्त्री गुरुजींचा आयसीसीला सल्ला!

प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात होण्यापूर्वी शास्त्री आणि कोहली यांच्यात वर्ल्ड टेस्ट फायनलसंदर्भात चर्चा रंगली होती. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Virat Kohli Ravi Shastri Audio Viral) त्यांच्या बोलण्यावरुन भारतीय ताफ्यातील नवोदित जलदगती गोलंदाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित असल्याचा अंदाज येतो. कोहली आणि शास्त्री यांना लाईव्ह सुरु झाल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांची चर्चा रेकॉर्ड झालीये.

Virat Kohli and Ravi Shastri

Virat Kohli and Ravi Shastri

कोहली आणि शास्त्री दोघांमध्ये गोलंदाजीच्या रणनितीवर चर्चा रंगल्याचे या क्लिपमध्ये ऐकायला मिळते. ऑडियोमध्ये पहिल्यांदा कोहली म्हणतोय की, ‘‘हम इनको राउड द विकेट डालेंगे, लेफ्ट हँडर्स है इनपे, लाला-सिराज सबको शुरू से ही लगा देंगे।’’ कोहलीच्या या विचारावर ‘हम्म।’ करत शास्त्रींनीही सहमती दर्शवल्याचे ऐकायला मिळते. या क्लिपमुळे सिराज- आणि मोहम्मद शमी (लाला) यांची प्लेइंग इलेव्हनमधील जागा फिक्स असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: फायनलचा दबाव नाही, आनंद घ्यायचाय - विराट कोहली

कोहलीने खेळाडूंच्या मानसिकतेसंदर्भातही मोठी गोष्ट केली आहे. तो म्हणाला की, आम्ही पहिल्यांदा इंग्लंडमध्ये जात नाही. त्यामुळे दबावात खेळण्याचा प्रश्नच उरत नाही. मैदानात उतरताना कोणत्याही परिस्थितीत मानसिकता कणखर ठेवायला लागेल. मानसिकदृष्ट्या कमजोर असल्यास विकेट गमावण्यासह विकेट मिळवण्यामध्ये अडचणीचा सामना करावा लागेल, असे कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

आम्ही मॅचपूर्वी सराव सामनेही खेळणार आहोत. इंग्लंडच्या मैदानात खेळण्याचा अनुभव असला तरी सरावाचा आम्हाला फायदा होईल. एक टीम म्हणून आम्ही सर्वोत्तम खेळ करुन दाखवू, असा विश्वास विराट कहोलीने व्यक्त केला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे कोहलीने पत्रकार परिषदेम्ध्ये सांगितले आहे.