
Virat Kohli : भावा आश्रमात आलोय... विराट कोहलीने सुनावलं, VIDEO व्हायरल
Virat Kohli Ashram Video : विराट कोहली 9 फ्रेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पुन्हा एकदा व्हेकेशनवर गेल्याचे दिसून आले. विराट कोहली छोट्या ब्रेकवर असून तो त्याची पत्नी अनुष्कासोबत उत्तराखंड येथे गेले आहेत. यावेळी या स्टार कपलने एका आध्यात्मिक आश्रमाला भेट दिली. तेथील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळत नाहीये. तो आता थेट ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार आहे. दरम्यान, विराट आणि अनुष्काला उत्तराखंड येथील एका आश्रमता पाहिलं गेलं. याबाबतच फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीने स्वामी दयानंद जी महाराज यांच्या समाधी स्थाळाला भेट दिली. यावेळी तो ऋषीकेश येथील स्वामी दयानंतर आश्रमात गेला होता. मात्र विराट कोहलीचा प्रसिद्धी झोत तेथेही त्याच्या मागे मागे आलाच! जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीची सही आणि फोटो घेण्यासाठी आश्रमात देखील झुंबड उडाली. यावेळी विराट या चाहत्यांवर थोडा चिडलेला देखील दिसला.
विराट कोहली गेल्या काही काळापासून सातत्याने ब्रेकवर जात आहेत. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ते दुबईल गेले होते. त्यापूर्वी त्यांनी वृंदावन येथे देखील भेट दिली होती. त्यानंतर विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर परतला. प्राईम टचमध्ये परतलेल्या विराटने अवघ्या काही आठवड्यातच 3 वनडे शतके ठोकली. आता तो ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत शतकी खेळी करण्यासाठी उत्सुक असेल.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ