बेन स्टोक्सची अचानक निवृत्तीवर विराट कोहली म्हणाला...

एकदिवसीय क्रिकेटमधून बेन स्टोक्सची निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीने मोठे केले वक्तव्य
Virat Kohli Replies to Ben Stokes Retirement
Virat Kohli Replies to Ben Stokes Retirementsakal

Virat Kohli Replies to Ben Stokes Retirement : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. स्टोक्स भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचाही खेळला होता. भारताने वनडे मालिका 2-1 ने जिंकली. बेन स्टोक्स निवृत्त होताच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने बेन स्टोक्सला शुभेच्छा दिल्या. विराट कोहली म्हणाला, मी आतापर्यंत ज्या खेळाडूंविरुद्ध खेळलो आहे त्यात तू सर्वात प्रतिस्पर्धी खेळाडू आहेस.

Virat Kohli Replies to Ben Stokes Retirement
World Championships: 35व्या वर्षीही शेली फ्रेझर जगातील सर्वांत वेगवान महिला धावपटू

बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त तो कसोटी क्रिकेट आणि टी-20 फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. बेन स्टोक्सची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.

बेन स्टोक्सने इंग्लंड संघाला विश्वचषक 2019 चे विजेतेपद स्वबळावर जिंकून दिल होत. त्याने फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 84 धावांची तुफानी इनिंग खेळली होती. स्टोक्सच्या कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला होता.

Virat Kohli Replies to Ben Stokes Retirement
एकाच दिवसात वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गजांची निवृत्ती

बेन स्टोक्सच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल तर, त्याने आतापर्यंत 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.44 च्या सरासरीने 2919 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने 87 डावात 41.79 च्या सरासरीने 74 बळी घेतल्या आहे. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.03 होता. बॉलसह त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 61 धावांत पाच विकेट्स आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com