Virat Kohli : विराट कोहली संघात परतला; रोहित - राहुलला मात्र होणार नाही आनंद?

Virat Kohli Return : विराट कोहली भारतीय संघात परतला, दुसऱ्या टी 20 सामन्यात खेळणार
Virat Kohli
Virat Kohliesakal

Virat Kohli Shubman Gill : भारताने पहिल्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव केला. सामन्यात शिवम दुबे, तिलक वर्मा, जितेश शर्मा, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी चांगले योगदान दिले होते. कालच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल ऐनवेळी प्लेईंग 11 मधून बाहेर गेला होता.

त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्या ऐवजी शुभमन गिल आणि रोहित शर्माने सलामी दिली होती. आता विराट कोहली दुसऱ्या टी 20 सामन्यात खेळणार असून संघ निवडताना रोहित शर्माला आणि राहुल द्रविडला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Virat Kohli
भारतीयांची आज अग्निपरीक्षा ; आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार

गिलने 12 चेंडूत 23 धावा केल्या मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. आता इंदूरमधील दुसऱ्या टी 20 सामन्यापूर्वी विराट कोहली संघात परतल्याने गिलच्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे. शिवम दुबेने पहिल्या सामन्यात 60 धावांची खेळी करून संघातील आपले स्थान पक्के केले आहे.

त्यातच पहिल्या सामन्यात रोहित शर्मा धावाबाद झाला होता. त्यानंतर शुभमन गिल आणि त्याच्यात थोडी बाचाबाची देखील झाली होती. यावरून शुभमन गिलवर नक्कीच दबाव आहे हे सिद्ध होत आहे.

विराट कोहली जवळपास 14 महिन्यानंतर टी 20 संघात परतला आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि राहुल द्रविडला संघात युवा आणि वरिष्ठ खेळाडूंचा समतोल साधण्याचं आव्हान पेलायचं आहे.

Virat Kohli
रिदम सांगवानची भारतासाठी ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी ; महिलांच्या २५ मीटर पिस्तूल या प्रकारात ब्राँझपदक

टी 20 संघात सलामीला डावं - उजवं कॉम्बिनेशन असावं असा संघ व्यवस्थापनाचा आग्रह आहे. त्यामुळे भारताचा उगवता तारा शुभमन गिलला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

भारतीय संघ जर सलामीला डावं - उजवं कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरणार असेल तर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावं लागेल. अशा परिस्थितीत जर दुसऱ्या टी 20 सामन्यात यशस्वी जयस्वाल फिट झाला तर शुभमन गिलवर कुऱ्हाड चालवली जाईल हे नक्की.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com