Virat Kohli : विराट कोहली मायदेशात परतला; ऋतुराजही कसोटी मालिकेला मुकणार

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीत मायदेशात परतला आहे. क्रिकेटच्या मैदानातील नवीन वळण: विराटची मुंबईत वापसी, ऋतुराज बाहेर?
Virat Kohli
Virat Kohliesakal

Virat Kohli Return To Home : भारताची रन मशिन विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीत मायदेशात परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अचानक आलेल्या कौटुंबिक अडचणीमुळे त्याला दौरा सोडून मायदेशात परतावे लागले आहे.

याचबरोबर ऋतुराज गायकवाड देखील कसोटी मालिकेला मुकणार असल्याचे वृत्त आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो तिसरा वनडे सामना देखील खेळू शकला नव्हता.

Virat Kohli
Mohammed Siraj : मोहम्मद सिराजने ठेवली 'पाच' ब्रोकन हार्टची स्टोरी; सोशल मीडियावर उठलं वादळ

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना हा 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सामन्यापूर्वीच भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मुंबईत परतला. त्यामुळे तो तीन दिवसीय इंट्रा स्क्वाड सराव सामन्याला मुकणार आहे.

विराट कोहली हा संध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तो भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ऐतिहासिक मालिकात एक महत्वाचा खेळाडू आहे. भारत ही मालिका जिंकण्यासाठी आतूर आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार कोहली कोणत्या कारणामुळे मुंबईत परतला आहे हे अजून समजू शकलेलं नाही. विराट तीन दिवसांपूर्वीत परवानगी घेऊन मायदेशात परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोहली पहिल्या कसोटीपूर्वी संघात पुन्हा दाखल होईल.

Virat Kohli
Mohammed Siraj : मोहम्मद सिराजने ठेवली 'पाच' ब्रोकन हार्टची स्टोरी; सोशल मीडियावर उठलं वादळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com