सेल्फी ले ले रे! 'वर्कलोड' हलका करण्याचा 'विराट फॉर्म्युला' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli And Anushka Sharma
सेल्फी ले ले रे! 'वर्कलोड' हलका करण्याचा 'विराट फॉर्म्युला'

सेल्फी ले ले रे! 'वर्कलोड' हलका करण्याचा 'विराट फॉर्म्युला'

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करत आहे. वर्कलोडमुळे टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीन घेतला होता. त्यानंतर तो आता विश्रांती घेत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट मैदानात दिसत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तो दर्शन देत आहे. विराट कोहलीने खास कॅप्शनसह ट्विटरवरुन एक फोटो शेअर केलाय. अनुष्कासोबतचा त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत एक सेल्फी काढून तो फोट शेअर केलाय. विराट कोहलीने जो फोटो शेअर केलाय त्यात अनुष्का आणि विराट दोघेही व्हाइट टी-शर्टमध्ये दिसत आहेत. अनुष्काची क्यूट पोझ आणि विराटचा अनोखा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा असाच आहे. 'माय रॉक' या खास कॅप्शनसह विराटने हा फोटो शेअर केला. विराट अनुष्काच्या सेल्फीवर काही तासांत लाखो प्रतिक्रियांची बरसात झाल्याचे दिसते.

हेही वाचा: जोश जास्तच High झाला... पाकिस्तानच्या हसन अलीला ICC चा दणका

विराट कोहलीसह अनुष्का शर्माही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. काही दिवसांपूर्वी तिने स्विमिंगपूलमधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर विराट कोहलीने लव्ह इमोजीसह प्रतिक्रिया दिली होती. त्याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. हे स्विट कपल सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असले तरी आपली मुलगी वाल्मिका हिला या सोशल जगापासून दूर ठेवण्याची काळजीही ते घेताना दिसते.

कसोटी सामन्यातून करणार एन्ट्री

न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर तीन टी-20 मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातून विराट पुन्हा मैदानात खेळताना दिसेल. टी-20 वर्ल्ड कपनंतर त्याने टी-20 संघाचे नेतृत्व सोडले आहे. वनडे आणि कसोटीत तोच टीम इंडियाचा कॅप्टन असेल. त्याच्यासाठी पुढील काळ महत्त्वाचा असेल.

loading image
go to top