Hasan Ali Pakistan | जोश जास्तच High झाला... पाकिस्तानच्या हसन अलीला ICC चा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोश जास्तच High झाला... पाकिस्तानच्या हसन अलीला ICC चा दणका

सेमीफायनला कॅच सोडल्याने हसनवर झाला होता टीकेचा भडीमार

जोश जास्तच High झाला... पाकिस्तानच्या हसन अलीला ICC चा दणका

PAK vs BAN, 1st T20 : टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या संघाला गाशा गुंडाळावा लागला. पण याच पाकिस्तानी संघाने बांगलादेश विरूद्ध टी२० मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी मिळवली. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. त्यातील पहिल्या सामन्यात हसन अलीने सामनावीराचा किताब पटकावला होता. वर्ल्ड कपच्या सामन्यात कॅच सोडल्याने हसन अलीवर टीका झाली होती, पण या दमदार कामगिरीमुळे हसन अलीने सुटकेचा निश्वास टाकला होता. अशातच त्या सामन्यातील एका गोष्टीमुळे त्याला ICC ने दणका दिला.

हेही वाचा: एकेकाळी होता विराटचा लाडका; रोहित आल्यावर करियर झालं उद्ध्वस्त

हसन अलीने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने ३ बळी टिपले. पण बांगलादेशच्या फलंदाजीच्या वेळी १७ व्या षटकात एक विचित्र गोष्ट घडली. हसनने नुरूलला बाद केले, त्यावेळी हसनने त्याच्याशी उद्धट वर्तन केले. त्याच्या या वर्तनामुळे त्याने ICC च्या नियमावलीतील २.५ कलमाचा भंग केल्यामुळे त्याला फटकारण्यात आले. तसेच, शिक्षा म्हणून त्याला १ डिमेरिट पॉईंट (नकारात्मक गुण) देण्यात आला.

बांगलादेशच्या संघालाही सामन्याच्या २० टक्के मानधन दंड म्हणून भरावे लागले. षटकांची गती कमी राखल्याने त्यांना हा फटका बसला.

हेही वाचा: PAK vs BAN 1st ODI: वर्ल्ड कपचा 'व्हिलन' हसन ठरला सामनावीर

Hasan-Ali-Pakistan-vs-Bangladesh

Hasan-Ali-Pakistan-vs-Bangladesh

सामना कसा रंगला?

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने २० षटकात ७ बाद १२७ धावांपर्यंत मजल मारली. अफीफ होसेनच्या ३६, मेहदी हसनच्या नाबाद ३० आणि नुरूल हसनच्या २८ धावांच्या खेळीमुळे बांगलादेशच्या संघाला कसाबसा १२० धावांचा टप्पा ओलांडता आला. पाककडून हसन अलीने २२ धावांत ३ बळी टिपले. १२८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था २४ धावांत ४ बळी अशी झाली होती. पण फखर झमानच्या ३४ धावा, खुशदील शाहच्या ३४ धावा आणि शादाब खानची १० चेंडू २१ धावांची तडाखेबाज खेळी यांच्या जोरावर पाकिस्तानने ४ चेंडू राखून सामना जिंकला.

loading image
go to top