Virat Kohli : एकटा विराटच! भारताचे फक्त 4 फलंदाज दुहेरी आकड्यात

India vs Bangladesh Virat Kohli
India vs Bangladesh Virat Kohliesakal

India vs Bangladesh Virat Kohli : बांगलादेशविरूद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक ही भारताची मोठमोठी नावं आपल्या लैकिकास साजेसा खेळ करू शकली नाही. अखेर भारताची रन मशिन पुन्हा एकदा भारतासाठी उभी राहिली. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत भारताला 184 धावांपर्यंत पोहचवले. सलामीवीर केएल राहुलने देखील यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. तसेच सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने देखील 16 चेंडूत 30 धावांची आक्रमक खेळी केली. अश्विनने 6 चेंडूत 13 धावा करून शेवटच्या षटकात मोठा हातभार लावला. मात्र या चौघांव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून हसन महमूदने दमदार गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या.

India vs Bangladesh Virat Kohli
Virat Kohli : विक्रम मोडला! किंग कोहली आता टी 20 वर्ल्डकपमधील 'राजा'माणूस

टी 20 वर्ल्डकपमधील महत्वाच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माला (2) स्वस्तात गमावले. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी डाव सावरत पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली.

केएल राहुलने सेट झाल्यावर गिअर बदलला. त्याला विराट कोहली चांगली साथ देत होता. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश पुसून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची ही 32 चेंडूत केलेली अर्धशतकी खेळी शाकिबने लगेचच संपवली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत आक्रमक 30 धावांची खेळी करत आपले इरादे स्पष्ट केले होते.

India vs Bangladesh Virat Kohli
Suryakumar Yadav : सूर्याने रिझवानची संपवली मक्तेदारी; अव्वल स्थान घेतले हिसकावून

मात्र बांगलादेशचा कर्णधार शाकिबने त्याचा 30 धावांवर त्रिफळा उडवत भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला. पाठोपाठ महमुदने हार्दिक पांड्याला 5 धावांवर बाद करत भारताचे टेन्शन वाढवले. मात्र विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक ठोकत भारताला 17 व्या षठकात 150 चा टप्पा पार करून दिला. यानंतर दिनेश कार्तिकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो 5 चेंडूत 7 धावांची भर घालून माघारी परतला. पाठोपाठ अक्षर पटेल देखील 7 धावा करून माघारी परतला.

अखेरच्या षटकात आर. अश्विनने एक षटकार आणि एक चौकार मारत भारताला 180 धावांचा टप्पा पार करून दिला. त्यानंतर विराट आणि अश्विनने या षटकात 14 धावा करत भारताला 20 षटकात 6 बाद 184 धावांपर्यंत पोहचवले. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com