esakal | अरेsss देवा! विराट टी20 क्रमवारीत किती खाली गेलाय बघा

बोलून बातमी शोधा

Virat Kohli slips down to 10th position in ICC T20 Ranking

न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत फारशा धावा न करू शकलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीचे मानांकन घसरले आहे. त्याची थेट 10 व्या स्थानावर घसरण झाली. मात्र फॉर्मात असलेल्या केएल राहुलने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून, रोहित शर्मा 11 व्या स्थानावर आहे.

अरेsss देवा! विराट टी20 क्रमवारीत किती खाली गेलाय बघा
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत फारशा धावा न करू शकलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीचे मानांकन घसरले आहे. त्याची थेट 10 व्या स्थानावर घसरण झाली. मात्र फॉर्मात असलेल्या केएल राहुलने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून, रोहित शर्मा 11 व्या स्थानावर आहे.

विंडीजच्या 'या' लोकप्रिय गोलंदाजाच्या कारला भयानक अपघात

विराट कोहलीच्या नावावर 673 गुण आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने (686) विराटला मागे टाकले आहे. मॉर्गनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके केली त्यामुळे त्याच्या मानांकनात प्रगती झाली. पोटरी दुखावल्यामुळे रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध खेळला नव्हता, त्यामुळे त्याच्या मानांकनात बदल झाला नाही. फलंदाजीच्या या क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमने अव्वल स्थान कायम राखले आहे.

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील 'तो' क्षण ठरला क्रीडाविश्वात सर्वोत्तम

एकदिवसीय क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान गमावणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची ट्‌वेन्टी-20च्या गोलंदाजी क्रमवारीतही घसरण झाली. तो 12 व्या क्रमांवर आला आहे. वेस्ट इंडीजच्या शेल्डन कॉट्रेल हा सुद्धा संयुक्तपणे 12 वा आहे.