सकाळी उठलो तरी तो पराभवच डोळ्यासमोर दिसतो : कोहली

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवाची सल अजूनही टोचत असल्याचे त्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवाची सल अजूनही टोचत असल्याचे त्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

तो म्हणाला, ''आम्ही कोणतीही चूक न करता आम्हाला पराभव स्वीकारावा लागला याचे फार वाईट वाटते. स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली होती, तरीही उपांत्यफेरीत असे अचानक पराभव होणे जिव्हारी लागले आहे. हा पराभव विसरणे खूप अवघड आहे. या पराभवाने खूप शिकवले आहे.''

विश्वकरंडकानंतर भारतीय संघ आता तीन ऑगस्टपासन वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्वेंटी20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli is still upset because of loss in World Cup 2019