Virat Kohli Test Retirement Reactions : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. विराटने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर पासून ते आयसीसीचे अध्यक्ष जय शहापर्यंत अनेकांनी विराटच्या निवृत्तीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.