इंग्लंडच्या मैदानावर भूत? रुटनंतर विराटचीही बॅट हवेत उभी

इंग्लंडच्या मैदानावर रुटनंतर विराटचीही बॅट हवेत राहिली उभी
virat kohli tries magic trick joe root
virat kohli tries magic trick joe root

इंग्लंड दौऱ्यावर असलेली टीम इंडिया लीसेस्टरशायरमध्ये चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर सराव सामन्याच्या पहिल्या डावात विशेष काही करू शकला नाही. यादरम्यान इंग्लंडच्या मैदानावर रुटनंतर विराटचीही बॅट हवेत उभी राहिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (virat kohli tries magic trick joe root watch video ind vs lei cricket)

virat kohli tries magic trick joe root
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे आऊट झाला फलंदाज Video Viral

सराव सामन्यात दरम्यान विराटने रूटची नक्कल करत करण्याचा प्रयत्न केला, जे इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने अलीकडे सोशल मीडियावर चाहत्यांना वेड लावले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या डावात जो रूट नॉन स्ट्राईक एंडला बॅट न हातात घेता उभा होता. जो रूटची बॅट स्वतःच हवेत उभी होती, आणि विराट कोहली सोबत पण तसंच झालं. कोहली सराव सामन्यात नॉन स्ट्राइकमध्ये उभे असताना त्याची पण बॅट हवेत उभी राहिली. त्यामुळे नेटकरी यांचा सवाल आहे की इंग्लंडच्या मैदानावर भूत वगैरे आले आहे का ?

विराटने सराव सामन्यात पहिल्या डावात 69 चेंडूत 33 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला. विराटला रोमन वॉकरने एलबीडब्ल्यू आऊट केले. वॉकरने सामन्यात आतापर्यंत पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या आहेत, ज्यात कोहलीसह कर्णधार रोहित शर्मा, हनुमा विहारीर आणि रवींद्र जडेजा यांच्या मोठ्या विकेट्सचा समावेश आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 8 बाद 246 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत 70 धावांवर नाबाद परतला. रोहित २५ धावा करून बाद झाला तर सलामीवीर शुभमन गिलने २१ धावांचे योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com