विराटची दुखापत पडणार पथ्यावर! घरच्या मैदानावर @100 ची संधी | Where Virat Kohli Play His 100th Test | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli 100th Test
विराटची दुखापत पडणार पथ्यावर! घरच्या मैदानावर @100 ची संधी

विराटची दुखापत पडणार पथ्यावर! घरच्या मैदानावर @100 ची संधी

जोहान्सबर्ग: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नव्या वर्षातील पहिल्या कसोटीत रखडलेला शतकांचे शतक करण्याचा प्रकल्प पुन्हा सुरु करेल असे वाटत होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीसाठी विराटच्या ऐवजी केएल राहुल मैदानात आला आणि विराट कोहली दुसऱ्या कसोटीला खेळणार नाही हे समजले. राहुलने विराटचे पाठीचे दुखणे (Virat Kohli Injury News) बळावल्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले. विराट कोहली ऐतिहासिक मालिका विजयासाठी महत्वाच्या असणाऱ्या कसोटीतच विराट कोहलीची अनुपस्थिती जाणवणार आहे. याचबरोबर दुसऱ्या कसोटीत तो खेळणार नाही त्यामुळे विराट केप टाऊनमध्ये आपला शंभरावा कसोटी सामना खेळण्याची शक्यताही मावळली आहे. (Where Virat Kohli Play His 100th Test)

हेही वाचा: SA vs IND : रहाणे-पुजाराचं करायचं काय?

दुसऱ्या कसोटीत के.एल. राहुल (KL Rahul) नाणेफेकीसाठी आला. त्याने विराट कोहली पाठीच्या दुखण्यामुळे या कसोटीत खेळणार नाही असे सांगितले. तो म्हणाला, 'दुर्दैवाने विराट कोहली पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. फिजिओ त्याच्यावर काम करत आहेत. आशा आहे की तो पुढच्या कसोटीपर्यंत फिट होईल.'

विराट कोहलीने आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. जर तो आजचा जोहान्सबर्गवरील कसोटी सामना (Test Cricket) खेळला असता तर तो 99 वा कसोटी सामना खेळला असता. त्यामुळे केप टाऊन कसोटी ही विराटची शंभरावी कसोटी (Virat Kohli 100th Test) ठरली असती. मात्र आता विराट जोहान्सबर्ग कसोटी खेळणार नसल्याने केप टाऊनची कसोटी ही विराटची 99 वी कसोटी होणार आहे.

हेही वाचा: श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर झाला होता बलात्कार?

रविवारी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी विराट कोहली पत्रकार परिषद का टाळतोय याचा खुलासा केला. त्यावेळी त्यांनी विराट कोहली 100 व्या कसोटीवेळी पत्रकार परिषद घेईल. बीसीसीआयच्या मीडिया टीमने त्याला शंभराव्या कसोटीसाठी राखून ठेवले आहे असे उत्तर राहुल द्रविडने दिले होते.

पण, आजच्या कसोटीला मुकल्यामुळे विराट कधी आपला शंभरावा कसोटी सामना खेळणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर विराट कोहली आता आपला शंभरावा कसोटी सामना मायदेशात खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर श्रीलंकेचा संघ भारतात (Sri Lanka Tour Of India) येणार आहे. त्यावेळी 25 फेब्रुवारीला भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. तोच सामना विराट कोहलीचा शंभरावा कसोटी सामना असू शकतो. विशेष म्हणजे विराट कोहली हा सामना बंगळुरुमध्ये (Bengaluru) खेळणार आहे. बंगळुरु हे आरसीबीचे होम ग्राऊंड आहे.

विराट कोहलीला गेल्या अनेक दिवसांपासून पाठीचे दुखणे सतावत आहे. तो गेल्या काही दिवसात पाठीच्या दुखण्यामुळे मैदानावरुन बाहेरही गेला आहे. विराटच्या अनुपस्थितीमुळे भारताची फलंदाजी कमकूवत झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top