श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूचा झाला होता बलात्कार? | Jamie Mitchell Rape Allegation latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jamie Mitchell Rape Allegation latest News
श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूचा झाला होता बलात्कार?

श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर झाला होता बलात्कार?

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनच्या (Tim Paine) सेक्सटिंग (Sexting) प्रकरणाचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अजून एका जुन्या प्रकरणात खुलाला करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघातील माजी खेळाडूने (U19 Australia Former Cricketer) भारत आणि श्रीलंका दौऱ्यावर असताना त्याच्यावर बलात्कार (Rape) झाल्याचा आरोप केला होता. (Jamie Mitchell Rape Allegation latest News)

1980 च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघाने भारत (India) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) दौरा केला होता. त्यावेळी जेमी मिशेल (Jamie Mitchell) हे ऑस्ट्रेलिया संघात होते. याचदरम्यान, संघातील एका अधिकाऱ्याने आपला बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा आरोप त्यांनी रविवारी ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय वृत्तावाहिनी ABC शी बोलताना केला. या आरोपानंतर वादात सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) लगेचच वक्तव्य प्रसिद्ध करत आम्ही या प्रकरणात जेमी मिशेल यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: 'क्विंटन डिकॉकने आम्हाला धक्काच दिला, पण....'

हेही वाचा: दुसऱ्या कसोटीपूर्वी राहुल द्रविडचे पुजाराबाबत महत्वाचे वक्तव्य

मिशेल यांनी एबीसीला (ACB) दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, १९८५ ला श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना दौऱ्याच्या शेवटच्या रात्री त्याच्यावर लौंगिक अत्याचार झाला होता. मिशेलच्या वकिलांनी प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात मिशेल म्हणतात की, ' त्या दौऱ्यामुळे माझे क्रिकेटिंग आयुष्य बरबाद झाले. या दौऱ्यावर मला मानसिक धक्का बसला आणि मी अनेक वर्षे तणावात होते.'

मिशेल प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात पुढे म्हणतात, 'क्रिकेट ऑस्ट्रेलियालाकडे या प्रकरणात योग्य ती कारवाई करुन आपण लैंगिक अत्याचार करणाऱ्यांची बाजू घेत नाही हे सिद्ध करण्याची संधी आहे. मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला काही प्रश्नांची यादी पाठवत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माझ्या प्रश्नांची उत्तरे देत पारदर्शकता दाखवली पाहिजे.'

हेही वाचा: जोहान्सबर्ग कसोटीची घंटी वाजणारी सिपोकाजी आहे तरी कोण?

दरम्यान, त्यावेळी राष्ट्रीय संघाच्या निवडसमितीत असणाऱ्या ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'मला आशा आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेची प्रतिमा जपण्यापेक्षा हे प्रकरण मानवी दृष्टीकोणातून आणि संवदेनशीलपणे हाताळेल. मिशेल यांनी केलेला हा धक्कादायक खुलासा आहे. असे काही घडले नसेल अशी मी आशा व्यक्त करतो. मात्र वास्तवात अशा घटना घडतल्याचे आपण पाहिले आहे.'

ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांच्या (Australian Federal Police) प्रवक्त्यांनी सांगितले की आम्ही एखाद्या विशिष्ट तपासाबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही.

Web Title: Former U19 Australian Cricketer Jamie Mitchell Alligetaion Of Raped On Tour Of India And Sri Lanka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top