Virat Anushka Comment | विराटचा मांजरीसोबत फोटो; अनुष्काने केली मजेशीर कमेंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Anushka-Cat-Instagram-Post

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट मुंबईत

विराटचा मांजरीसोबत फोटो; अनुष्काने केली मजेशीर कमेंट

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील हॉट & फिट जोडीपैकी एक मानलं जातं. क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दोघेही एकमेकांना नेहमी सपोर्ट करत असतात. विराट-अनुष्काला या वर्षी जानेवारी महिन्यात कन्यारत्नप्राप्ती झाली. त्यानंतर विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यातून मायदेशी परतला होता. पण नंतर त्याला सातत्याने क्रिकेटसाठी घरापासून लांबच राहावे लागले. IPL आणि वर्ल्ड कप दरम्यान अनुष्का आणि त्याची कन्या वामिका त्याच्यासोबत होती, पण विराटला अपेक्षित विश्रांती मिळालेली नव्हती. त्यामुळे टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंड विरूद्धच्या टी२० मालिकेत त्याने ब्रेक घेतला आणि कसोटी मालिकेसाठी तो संघात परतला. या दरम्यानचा त्याचा एक फोटो चर्चेत आहे.

हेही वाचा: IND vs NZ: हिटमॅनचा 'झकास' विक्रम; विराट, धोनीला टाकलं मागे

विराट सध्या मुंबईत आहे. तेथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मैदानावर कसोटी मालिकेचा सराव करण्यासाठी तो दाखल झाला. तेव्हा त्याने एक छानशा मांजरीसोबत फोटो क्लिक केला आणि पोस्ट केला. 'सरावासाठी हजर असलेल्या गोंडस मांजरीकडून साऱ्यांना हॅलो', अशी कॅप्शन त्याने दिली.

या फोटोवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. त्यात विराटची पत्नी अनुष्काची छान आणि मजेशीर कमेंट आली. अनुष्का मांजरीच्या लोभसवाण्या रूपाचं कौतुक करणारी कमेंट करेल आणि विराटसाठी काही तरी खास शब्द वापरेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण तिने, 'हॅलो बिल्ली' अशी केवळ दोन शब्दांची मजेशीर कमेंट केली. या कमेंटलाही मोठ्या प्रमाणावर लाईक्स अन् कमेंट्स आल्या.

Anushka-Comment-on-Virat-Photo

Anushka-Comment-on-Virat-Photo

दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंड विरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट आणि रोहित दोघेही संघात समाविष्ट नसतील. त्यामुळे संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असेल. दुसऱ्या सामन्यासाठी विराट संघात परतणार आहे.

loading image
go to top