Rohit vs Virat vs Dhoni | IND vs NZ: हिटमॅनचा 'झकास' विक्रम; विराट, धोनीला टाकलं मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Virat-Dhoni

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला केलं पराभूत

IND vs NZ: हिटमॅनचा 'झकास' विक्रम; विराट, धोनीला टाकलं मागे

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ, T20 Series : न्यूझीलंडच्या संघाला भारताने ३-०ने पराभूत करत मालिका जिंकली. रोहित शर्मा पूर्णवेळ टी२० कर्णधार झाल्यावर पहिल्याच मालिकेत त्याला दमदार यश मिळाले. भारताचा नवा टी२० कर्णधार त्याच्या दमदार फलंदाजीसाठीही कौतुकास पात्र ठरला. पहिल्या सामन्यात त्याचे अर्धशतक दोन धावांनी हुकले पण पुढील दोन्ही सामन्यात अर्धशतके ठोकत त्याने मालिकावीराचा किताब पटकावला. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने सर्वाधिक १५९ धाला केल्या. आपल्या पहिल्याच मालिकेत त्याने विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांना मागे टाकलं. (Rohit Sharma overtakes Virat Kohli MS Dhoni as most whitewash in T20)

हेही वाचा: IND vs NZ: "डोक्यात लगेच हवा जाऊ देऊ नका"; द्रविडची ताकीद

रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधार म्हणून जरी पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व केलं असलं तरी याआधी विराटच्या अनुपस्थितीत त्याने काही वेळा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाखालील भारताने न्यूझीलंड व्हाईटवॉश देताच त्याने दोन यशस्वी कर्णधारांना मागे टाकले. टी२० क्रिकेटमध्ये मालिका खेळताना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने केवळ एकदा तर विराटच्या नेतृत्वाखाली दोन वेळा भारताने विरोधी संघाला व्हाईटवॉश दिला होता. पण रोहितच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला व्हाईटवॉश दिला.

हेही वाचा: IND vs NZ: धडाकेबाज मालिका विजयानंतरही रोहित नाराज, कारण...

हेही वाचा: Video: दीपक चहरचा 'जंबो' षटकार; रोहित शर्मानेही ठोकला सलाम

दरम्यान, मालिका विजयानंतर रोहित म्हणाला, "मी जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा सुरूवात चांगली व्हावी यासाठीच मी खेळत असतो. संघाला धडाकेबाज सुरूवात मिळवून देणे हाच विचार फलंदाजी करताना माझ्या डोक्यात असतो. एकदा पिच आणि इतर गोष्टींचा अंदाज आला की फलंदाज म्हणून काय करायचं ते तुम्हाला माहिती असतं. मी खेळताना चेंडू चांगल्या वेगाने बॅटवर येत होता. त्यामुळे डावाला चांगली सुरूवात करून देणे हात माझा विचार होता. आमच्याकडे प्लॅन तयार होता. आम्ही दमदार खेळ करायला सुरूवात केली, पण मधल्या फळीतील खेळाडूंनी आम्हाला निराश केलं. अखेर खालच्या फळीतील खेळाडूंच्या फलंदाजीमुळे आम्हाला अपेक्षित धावा करता आल्या."

loading image
go to top