Happy Birthday Virat Kohli : वाढदिवशी विराटने लिहले स्वत:लाच भावूक पत्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या 31व्या वाढदिवसामिनित्त ट्विटरवर एक पत्र शेअर केलं आहे जे त्यानं 15 वर्षांच्या चीकूला म्हणजेच स्वत:लाच लिहले आहे. त्याने 15 वर्षांच्या चीकूला आयुष्यात शिकलेल्या गोष्टींबद्दल सांगितले आहे. 

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या 31व्या वाढदिवसामिनित्त ट्विटरवर एक पत्र शेअर केलं आहे जे त्यानं 15 वर्षांच्या चीकूला म्हणजेच स्वत:लाच लिहले आहे. त्याने 15 वर्षांच्या चीकूला आयुष्यात शिकलेल्या गोष्टींबद्दल सांगितले आहे. 

INDvsBAN : सर्वांना प्रदूषणाची चिंता मात्र, मुशफिकूरला चिंता भलत्याच गोष्टीची

त्याने लिहले आहे, ''हाय चीकू, सर्वांत आधी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! मला माहित आहे तुला तुझ्या भविष्याबाबत खूप प्रश्न आहेत मात्र, मी सगळ्याच प्रश्नांची उत्तर नाही देऊ शकतं कारण मला नाही माहित पुढे तुझ्यासाठी काय सरप्राईज ठेवले आहेत. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तिथे पोहोचण्याचा प्रवास जास्त महत्वाचा असतो आणि माझा हा प्रवास सुपर आहे.''

त्याच्या परिवाराबद्दल लिहताना तो चीकूला म्हणतो, "तुला असं वाटतं असेल की आई-बाबा तुला आता समजून घेत नसतील पण नेहमी लक्षात ठेव की कोणत्याही परिस्थितीत हा परिवारच आपल्यासोबत उभा राहतो. त्यांच्यावर प्रेम कर, त्यांचा आदर कर आणि जोवर त्याच्यासोबत आहेस त्यांना वेळ दे. बाबांना सांग की तुझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. हे त्यांना तु रोज सांग, जेव्हा संधी मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा सांग.''

Happy Birthday Virat Kohli : सुरवंटाचं फुलपाखरु झालं...

त्याने स्वत:ला लिहलेलं हे भावूक पत्र खूप व्हायरल होत आहे. कोहली सध्या भूतानमध्ये त्याची पत्नी अनुष्कासोबत ट्रीपवर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याला दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli writes a letter to 15 year old self on 31st birthday