
LLC T20 : विरेंद्र सेहवाग इंडियन महाराजा टीमचा असणार कर्णधार
नवी दिल्ली : ओमानच्या मस्कत क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या लेजंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेत इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व विरेंद्र सेहवागकडे (Virender Sehwag) सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे. LLC ही T20 क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत इंडियन महाराजा, एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट हे तीन संघाचा समावेश आहे. (Virender Sehwag Captain of Indian Maharaja Team in LLC T20)
हेही वाचा: पैसे नसायचे अन् तिची भेट टळायची; ग्रँडस्लॅमच्या राजाची प्रेमकहाणी
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले होते. आता तो इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व करणार आहे. सेहवाग बरोबरच मोहम्मद कैफला (Mohammed Kaif) इंडियन महाराजा संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे. याचबरोबर या संघाचे प्रशिक्षक जॉन बुचनन असणार आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह - उल - हक (Misbah-Ul-Haq) हा एशिया लायन्स संघाचा कर्णधार असणार आहे. या संघाचा उपकर्णधार हा श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान असणार आहे. तर 1996 चा वर्ल्डक जिंकून देणारा लंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा हा एशिया लायन्सचा प्रशिक्षक असेल.
हेही वाचा: धोनीच्या 'कैलाशपती' फार्महाऊसची रंजक स्टोरी
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेल सॅमी (Daren Sammy) वर्ल्ड जायंट संघाचे नेतृत्व करेल. त्याने यापूर्वी कॅरेबियन लीगमध्ये सेंट लुसिया झुक्स संघाचे नेतृत्व केले होते. दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स वर्ल्ड जायंटचा खेळाडू तसेच मेंटॉरही असणार आहे.
लेजंड लीग क्रिकेट टी 20 स्पर्धेचे आयुक्त म्हणून रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या स्पर्धेविषयी म्हणाले की, 'मी लेजंड लीग क्रिकेट स्पर्धेत काम करण्यासाठी उत्सुक आहे. मला आशा आहे की या स्पर्धेतील सर्व खेळाडू त्यांचे विशेष कौशल्य पणाला लावून खेळतील.' लेजंड लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेचे प्रसारण सोनी पिक्चर नेटवर्कवर होणार आहे. तर सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर देखील या स्पर्धेतील सामने पहावयास मिळणार आहेत.
Web Title: Virender Sehwag Will Lead Indian Maharaja Team In Llc T20 Tournament
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..