'मी पाकिस्तानी आहे का?' या पद्मश्री विजेत्या पैलवानाच्या प्रश्नाला सरकारचं उत्तर

'मी पाकिस्तानी आहे का?' या पद्मश्री विजेत्या पैलवानाच्या प्रश्नाला सरकारचं उत्तर
Summary

पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्र्यांना टॅग करून पद्मश्री विजेत्या पैलवानाने त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.

चंदिगढ - हरयाणाचा (Haryana) मूक बधीर पैलवान विरेंद्र सिंह (Virendra Singh) याने पुन्हा एकदा राज्यातील बधिर खेळाडुंना पॅरा अॅथलिट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. यावर आता हरयाणाच्या सरकारकडून राज्याचे क्रीडा संचालक पंकज नैन (Pankaj Nain) यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, देशात सर्वाधिक १ कोटी २० लाख रुपये बक्षीस म्हणून विरेंद्र सिंह यांना देण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक अशी ही रक्कम आहे. तसंच याआधी राज्याच्या क्रीडा विभागात सध्या ते काम करत आहेत. तसंच पॅरालिंपियनच्या बरोबरीने त्यांना गट ब दर्जाचे पद देण्यात आले होते. मात्र ते स्वीकारण्यास विरेंदर सिंह यांनी नकार दिला.

शनिवारी विरेंद्र सिंह यांनी ट्वटिरवरून हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना सवाल विचारला होता. त्यांनी म्हटलं होतं की, मी पाकिस्तानचा आहे का? कधी समिती बनणार आणि समान अधिकार मिळणार? विरेंद्र सिंह यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनाही टॅग केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, पंतप्रधान मोदीजी, जेव्हा मी तुम्हाला भेटलो तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात की आम्ही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, आता तुम्हीच बघा.

पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या विरेंद्र सिंह यांनी याआधीही त्यांच्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसले आहेत. त्यांनी हरयाणाच्या विधानभवनाबाहेर धरणे आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांपासून ते क्रीडा संचालकांशी भेटल्यानंतरही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. यानंतर विरेंद्र सिंह हे विधानभवानच्या बाहेर धरणे आंदोलनासाठी बसले होते.

'मी पाकिस्तानी आहे का?' या पद्मश्री विजेत्या पैलवानाच्या प्रश्नाला सरकारचं उत्तर
'विराटच्या राजीनाम्याचा निर्णय हा...', सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

१९७० मध्ये हरयाणात जन्मलेले विरेंद्र सिंह हे भारताचे माजी पैलवान आहेत. त्यांनी २००५ मध्ये मेलबर्न डेफलंपिक्समध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. तसंच २००९ च्या तैपेई डेफलंम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. २००८ आणि २०१२ मध्ये बधीरांसाठीच्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी रौप्य आणि कांस्यपदकावर नाव कोरलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com