
Visually Impaired Asif Iqbal run Full Marathon at Tata Mumbai Marathon 2025 : कोलकाता इथे राहाणारा दृष्टिहीन असिफ इक्बाल टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. यावेळी तो पूर्ण मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहे. २०२३ व २०२४ मध्ये तो अर्ध मॅरेथॉन धावला होता. पण तो त्याच्या दोन मित्र धावपटूंसोबत त्याची पहिली पूर्ण मॅरेथॉन धावणार आहे, ज्यामध्ये ते त्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात मदत करतील. संपूर्ण मॅरेथॉन ८:१५ वेगाने धावून ५ तास ५० मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
"माझ्यासाठी, मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही. तर, स्वतःला आणि जगाला दाखवून देण्याची ही एक संधी आहे की आपल्याला वाटत असलेल्या मर्यादा फक्त आपल्या मनात आहेत." असिफ म्हणाला.