WADAनेच केले हात वर, आता पृथ्वी शॉला कोण वाचविणार?

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यांच्याविरुद्ध होणाऱ्या उत्तेजक सेवन चाचणी प्रक्रियेला क्लिनचिट दिली आहे. पृथ्वीचे प्रकरण व्यवस्थितपणे न हाताळल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेतर्फे (नाडा) वाडा या प्रकरणाचा पुनर्आढावा घेणार होती. त्यानुसार वाडाने या प्रक्रियेला क्लिनचिट दिली आहे. 

नवी दिल्ली : जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यांच्याविरुद्ध होणाऱ्या उत्तेजक सेवन चाचणी प्रक्रियेला क्लिनचिट दिली आहे. पृथ्वीचे प्रकरण व्यवस्थितपणे न हाताळल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेतर्फे (नाडा) वाडा या प्रकरणाचा पुनर्आढावा घेणार होती. त्यानुसार वाडाने या प्रक्रियेला क्लिनचिट दिली आहे. 

''वाडातर्फे यातील तीनही प्रकरणांचा नीट अभ्यास करण्यात आला आहे. या तीनही प्रकरणांमध्ये एक्सटर्नल लिगल काउन्सिलचा सल्ला हवा होता. त्यामुळे वाडा या निर्णयावर ठाम आहे की ही प्रक्रिया नाडाच्या नियमांमुसारच आहे. त्यामुळेच याविरोधात कोणताही तक्रार दाखल केली जाणार नाही,'' असे वाडाने स्पष्ट केले. 

अनेक वर्षांपासून उत्तेजक सेवन चाचणीच्या बंधनापासून दूर राहणाऱ्या बीसीसीआयने नुकतीच नाडाची बंधने स्विकारली आहेत. त्यामुळे आता भारतीयांची उत्तेजक चाचणी कधीही आणि कोठेही होऊ शकते. 

खोकल्याच्या औषधातून अजाणतेपणे उत्तेजक सेवन झाल्यामुळे पृथ्वी शॉवर सध्या आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्याचे वय कमी असल्याने आणि त्याने अजाणतेपणाने औषधाचे सेवन केल्याने त्याला कमी शिक्षा झाली आहे. मात्र, नाडाच्या नियमाप्रमाणे पृथ्वी शॉला बंदीचा सामना करावा लागेल आणि ती बंदी मोठी असू शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WADA Gives Clean Chit To Prithvi Shaws Doping Test Process