सचिनला मुद्दाम जखमी केलं, शोएब अख्तरने सांगितला तो किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिनला मुद्दाम जखमी केलं, शोएब अख्तरने सांगितला 'तो' किस्सा
सचिनला मुद्दाम जखमी केलं, शोएब अख्तरने सांगितला 'तो' किस्सा

सचिनला मुद्दाम जखमी केलं, शोएब अख्तरने सांगितला 'तो' किस्सा

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि टीम इंडियाचा दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्यातील वैर नेहमीच चर्चेत असते. या मुद्द्यावर बोलताना शोएब अख्तरने मैदानातील एक किस्सा सांगितला आहे, यामध्ये त्याने सचिन तेंडुलकरला जाणूनबुजून जखमी केलं असल्याचे म्हटलं आहे.

शोएब अख्तरनं 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलताना सचिनसोबतचा एक किस्सा पहिल्यांदाच शेअर केला. हे. भारतीय क्रिकेट टीम 2006 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्या मालिकेतील तिसऱ्या टेस्टमध्ये सचिनला जखमी करणे हा आपला उद्देश होता हे अख्तरनं यावेळी कबुल केलं.

हेही वाचा: हातमाग कारागिराची कमाल, साकारला कापडावर धोनी-जीवामधील प्रेमळ क्षण

'मी जाणीवपूर्वक सचिनला जखमी करण्याचा प्रयत्न करत होतो. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये सचिनला त्या मॅचमध्ये जखमी करायचं होतं. स्टम्पच्या समोरून बॉल टाक असं मला इंझमान सांगत होता. पण, मला सचिनला जखमी करायचं होतं, मी त्याच्या हेल्मेटवर बॉल मारला. त्यावेळी तो जखमी झाला असं मला वाटलं. पण, व्हिडीओ पाहिल्यानंतर सचिन स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झाल्याचं मला समजलं,' असा खुलासा अख्तरने यावेळी केला.

तसेच तो पुढे म्हणाला, मी एका बाजून सचिनला जखमी करण्याचा प्रयत्न करत होतो तर दुसऱ्या बाजूनं मोहम्मद असिफ त्याच्या फास्ट बॉलिंगने भारतीय खेळाडूंना सतावत होता. असिफनं त्या दिवशी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली तशी मी बॉलिंग मी आजवर आयुष्यात कुणीही केलेली पाहिली नाही.' अशा शब्दात त्यानं असिफचं कौतुक केलं.

हेही वाचा: श्रीसंतला कानाखाली वाजवणे ही माझी चूकच, भज्जीने दिली कबुली

२००६ मध्ये भारताय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना कराची येथे खेळवण्यात आला होता. या कसोटी सामन्यात सचिनला पहिल्या डावात अब्दुल रझाकने २३ धावांवर आणि दुसऱ्या डावात आसिफने २६ धावांवर बाद केले होते. भारताने ही लढत ३४१ धावांनी गमावली होती.

Web Title: Wanted To Hit Sachin Shoaib Akhtar Reveals His Intention Was To Hurt Tendulkar And Not Dismiss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top