भारतात मी महान गोलंदाज पाकिस्तानात मात्र मॅच फिक्सर; वसिमचं खळबळजनक वक्तव्य | Wasim Akram VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wasim Akram Video

Wasim Akram VIDEO : भारतात मी महान गोलंदाज पाकिस्तानात मात्र मॅच फिक्सर; वसिमचं खळबळजनक वक्तव्य

Wasim Akram Video : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने एका स्पोर्ट्स शोमध्ये खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्याने 9 स्पोर्ट्सच्या एका संडे स्पोर्ट्स या कार्यक्रमात हे वक्तव्य केले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अक्रम म्हणतोय की मला भारतात आजही महान गोलंदाजांपैकी एक मानले जाते मात्र पाकिस्तानात मला आजची पिढी एक मॅच फिक्सर म्हणून संबोधते.

वसिम अक्रम आपल्या व्हिडिओत म्हणतोय की, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि भारतात माझे नाव हे जागतील सर्वोत्तम वर्ल्ड इलेव्हनमध्ये घेतले जाते. ते मला जगातील एक महान गोलंदाजांपैकी एक म्हणून सन्मान देतात. मात्र पाकिस्तानात आताची सोशल मीडिया जनरेशन मला मॅच फिक्सर म्हणून संबोधते.'