Rohit Sharma : आपण विराट, बाबरची चर्चा करतोय मात्र रोहितसारखा... पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची स्तुतीसुमने

जागतिक क्रिकेटमध्ये रोहित शर्मासारखा दुसरा खेळाडू नाही : वसिम अक्रम
Rohit Sharma
Rohit Sharmaesakal

Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळी फेरीतील आपला नववा आणि शेवटचा सामना जिंकला. साखळी फेरीत अजिंक्य राहिलेला भारत आता सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत वानखेडेवर भिडणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने भारताच्या लीग स्टेजमधील या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केलं. त्याचबरोबर रोहित शर्माबद्दलही मोठं विधान केलं.

Rohit Sharma
Virender Sehwag : सेमी फायनलआधी ICC ची मोठी घोषणा! भारतीय दिग्गज खेळाडूची 'Hall of Fame'मध्ये एन्ट्री

नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी तडाखा दिला. त्यापूर्वी सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 10 षटकातच भारतला शतकाजवळ नेऊन ठेवलं होतं. भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या होत्या. त्यानंतर नेदरलँड्सला 250 धावात गुंडाळत भारताने सामना 160 धावांनी जिंकला.

भारताच्या या दमदार विजयाचे विश्लेषण करताना पाकिस्तान स्पोट्स चॅनलवर वसिम अक्रम, शोएब मलिक आणि मिसबाह - उल - हक यांनी आपले मत व्यक्त केले. पाकिस्तानच्या तीनही माजी कर्णधारांनी रोहित शर्माचे विशेष कौतुक केले.

Rohit Sharma
World Cup 2023 : 'नव्याने होणाऱ्या संघउभारणीत नेतृत्व करण्याची इच्छा' पाकिस्तानच्या कर्णधारपदी बाबर कायम

वसिम अक्रम म्हणाला की, 'भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या. त्यात रोहित शर्माने 61 तर शुभमन गिलने 32 चेंडूत 51 धावा चोपल्या. पहिल्या 10 षटकातच त्यांनी 91 धावा केल्या होत्या. तेथेच सामना संपला होता. ते पुन्हा ज्या प्रकारे खेळले आहेत. रोहित शर्माने 54 चेंडूत 61 धावा केल्या. त्यात 8 चौकार दोन षटकार! असा खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये दुसरा असले असे मला वाटत नाही.'

'आपण विराट कोहली, जो रूट, केन विलियमसन, बाबर आझमबद्दल बोलतोय. मात्र हा खेळाडू वेगळाच आहे. तो खेळताना फलंदाजी खूप सोपी वाटते. तो कोणत्याही परिस्थिती, कोणत्याही गोलंदाजाविरूद्ध लिलया फटकेबाजी करतो.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com