
'क्रिकेटला राम राम कर ' किंग कोहलीला दिग्गजाचा सल्ला
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. 33 वर्षीय कोहलीने यंदाच्या मोसमात 12 मॅचमध्ये केवळ 216 रन केल्या आहेत. त्याची ही कामगिरी पाहता क्रिकेट वर्तुळात अनेक दिग्गज त्याला ब्रेक घेण्याचा सल्ला देत आहेत. अशातच, टीम इंडियाचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim jaffer) कोहलीली क्रिकेटला राम राम करण्याचा सल्ला दिला आहे.(Wasim Jaffer Suggested Virat Kohli to take a Break)
हेही वाचा: पत्नी अनुष्का शर्मासोबत विराट कोहली पोहोचला जिममध्ये -Video Viral
आयपीएल 15 व्या सीझनमध्ये विराट कोहली तीन वेळा शुन्यावर बाद झाला आहे. तसेच त्याने 19.64 सरासरी आणि 111.34 स्ट्राईक रेटने केवळ 216 रन केल्या आहेत. विराटची सध्याची खराब कामगिरी पाहता वसीम जाफरने क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीच्या पदरी निराशा पडली. विशेष म्हणजे विराट कोहली याही सामन्यात डग आऊट झाला. त्याची ही निराशजनक कामगिरी पाहात वसीम जाफरने आयपीएल 2022 नंतर क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घे. असा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: Virat Kohli IPL: विराट कोहली पुन्हा बंगळुरुचा कर्णधार होतो तेव्हा...
एका वृत्तसंस्थेशी बोलताना जाफरने विराटला धक्कादायक सल्ला दिला आहे. ज्या प्रकारे कोहली गेल्या काही मॅचमध्ये आऊट झाला आहे. त्यावरुन असे वाटते की अधिक क्रिकेट खेळून तो थकला आहे. गेले 6 महिने त्याचा प्रवास खडतर राहिला आहे. कारण त्याने टेस्ट आणि टी 20 कर्णधार पदाचा राजीनामा आणि वन डे कर्णधार पदावरूनही तो पाय उतार झाला आहे.
या सर्व प्रवासातुन जाता असतानाच तो आयपीएल खेळत आहे. आरसीबीसाठी तो अपेक्षेप्रमाणे स्कोर करु शकलेला नाही. त्याची मानसिकता ठीक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी त्याला सल्ला देत आहे की, आयपीएल 2022 नंतर कोहलीने काही महिने ब्रेक घे आणि मानसिकदृष्ट्या ठिक होत पुन्हा परतेल.
तसेच, कोहलीकडे आता कर्णधार पदाची जबाबदारी नसल्यामुळे त्याच्यावरचा ताण कमी आहे. त्यामुळे मला असे वाटते की जेव्हा कोहीली ब्रेक घेऊन परत येईल तेव्हा त्याची मानसिक स्थिती ठीक असेल. तो त्याच्या प्रदर्शनावर लक्ष देईल. त्यामुळे मला मनापासून असे वाटते की, त्याने दक्षिण आणि इंग्लंड सीरीमध्ये दरम्यान ब्रेक घ्यावा. आणि पुन्हा अशिया कप खेळण्यासाठी मैदानात परतावे.
यापूर्वी त्याचे गुरु म्हणजेच टीम इंडियाचे माजी मुख्या प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील कोहलीला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.
Web Title: Wasim Jaffer Suggested Virat Kohli To Take A Break
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..