
'हम करे तो साला कॅरेक्टर ढिला हैं' म्हणत जाफरने इंग्रजांना दाखवला आरसा
नवी दिल्ली : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England Vs New Zealand) यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) सुरू आहे. इंग्लंडमध्ये होत असलेल्या या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरूवारी ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords) मैदानावर सुरू झाला. या सामन्याचा पहिला दिवस दोन्ही संघातील गोलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवशी तब्बल 17 विकेट गेल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा पहिला डाव इंग्लंडने 132 धावात गुंडाळला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची देखील पहिला दिवस संपेपर्यंत 7 बाद 116 धावा अशी अवस्था झाली. यावरूनच भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरने (Wasim Jaffer) एक मीम शेअर करत यजमान इंग्लंडची खेचली.
हेही वाचा: बांगलादेश क्रिकेटचा 'विकस' आता जाफरच्या हाती?
वासिम जाफरने शेअर केलेल्या मीममध्ये सलमान खानच्या चित्रपटातील एक गाण्याचे बोल वापरण्यात आले. शेअर केलेल्या सलमानच्या फोटोवर 'हम करें तो साला कैरेक्टर ढीला है.' असे लिहिले होते. या फोटोला जाफरने 'ज्यावेळी लॉर्ड्सवर एका दिवसात 17 विकेट जातात त्यावेळी ते गोलंदाजांच्या कौशल्याची चर्चा होते. तर अहदाबादमध्ये एका दिवसात 17 विकेट जातात त्यावेळी चर्चा खेळपट्टीची होते.' असे कॅप्शनही दिले.
हेही वाचा: रिझवान म्हणतो, भारतीय खेळाडू पाकिस्तानशी खेळण्यास उत्सुक मात्र...
गेल्या वर्षी इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी इंग्लंडला कसोटी मालिकेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी 24 ते 25 फेब्रुवारीदरम्यान, मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पहिल्याच दिवशी 17 विकेट पडल्या होत्या. यावेळी इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीवर टीका केली होती.
दरम्यान, वासिम जाफर आता बांगलादेश क्रिकेट असोसिएशनमध्ये मोठी भुमिका बजावण्याची शक्यता आहे. तो बांगलादेश क्रिकेटमध्ये खेळ विकास विभागात कार्यरत होण्याची शक्यता आहे. तो यापूर्वीही बॅटिंग सल्लागार म्हणून बांगलादेश क्रिकेटशी जोडला गेला होता.
Web Title: Wasim Jaffer Take A Dig On Former English Cricketer After 17 Wicket Fallen In A Day At Lords
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..