आठवतंय यानं चेंडू कुरतडला होता, आता काय वाढीव कॅच घेतलाय बघा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

त्याने इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सचा शॉर्टलेगला भन्नाट झेल पकडला. पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू त्याने हवेत मारला पण तो हवेत अगदी काही क्षणच राहिला आणि बॅंक्रॉफ्टने डाव्या बाजून झोपावत त्याचा झेल घेतला. त्यानंतर बर्न्सला काही वेळ आपण बाद झाल्याचे कळालेच नाही म्हणून तो खेळपट्टीवर तसाच उभा राहिला.

लंडन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्यामुळे नऊ महिन्यांची बंदी घातलेला वेगवान गोलंदाज कॅमरॉन बॅंक्रॉफ्टने ऍशेस मालिकेतून संघात पुनरागमन केले. पुनरागमनात त्याची दणक्यात चर्चा होत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. ऍशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने शॉर्ट लेगला एक भन्नाट झेल पकडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा होत आहे. 

त्याने इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सचा शॉर्टलेगला भन्नाट झेल पकडला. पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू त्याने हवेत मारला पण तो हवेत अगदी काही क्षणच राहिला आणि बॅंक्रॉफ्टने डाव्या बाजून झोपावत त्याचा झेल घेतला. त्यानंतर बर्न्सला काही वेळ आपण बाद झाल्याचे कळालेच नाही म्हणून तो खेळपट्टीवर तसाच उभा राहिला. 

ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने बॅंक्रॉंफ्टचा शॉर्टलेगचा सराव पाहून त्याचे कौतुक केले होते. त्याने आता स्टीव्ह वॉला योग्य ठरवत भन्नाट झेल घेतला आहे. 

''जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा कोणालाच शॉर्टलेगला थांबायचे नसायचे कारण ते एक प्रकारचा त्रास होता. मात्र, इंग्लंड तुम्हा आता सावध रहा, बॅंक्रॉंफ्ट सर्वोत्तम शॉर्टलेग फिल्डर आहे,'' अशा शब्दांत वॉने त्याचे कौतुक केले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch Cameron Bancroft Takes An Unbelievable Catch