VIDEO : दिनेशची बल्ले बल्ले! 500 च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

Dinesh Bana
Dinesh Bana Sakal

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये (U-19 WC IND vs AUS) भारीत संघाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 96 धावांनी पराभूत करत फायनल गाठली आहे. भारताकडून कर्णधार यश धूल 110 आणि शेख राशीदनं 94 धावांची खेळी साकारली. या दोघांच्या मोठ्या खेळीशिवाय एक छोटीखानी खेळीही लक्षवेधी अशीच होती.

भारतीय संघाने (India U19)निर्धारित 50 षटकात 5 बाद 290 धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाना (Dinesh Bana) याने तुफान फटकेबाजी केली. त्याने केवळ चार चेंडूत 500 च्या स्ट्राईक रेटनं 20 धावा कुटल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार खेचले. यश धूल आणि शेख राशीदशिवाय त्याने आपल्या फटकेबाजीन विशेष छाप सोडली.

दिनेश बाना (Dinesh Bana) याने अंडर-19 वर्ल्ड कप (Under-19 World Cup) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये आपल्या भात्यात मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. बाना पुरुष, महिला आणि अंडर-19 च्या कोणत्याही क्रीडा प्रकारात 4 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू खेळून केवळ बाउंड्रीच्या रुपात धावा करणारा एकमेव खळाडू आहे. हा एक विक्रमच आहे.

Dinesh Bana
ग्रीक फुटबॉलपटूचा रूग्णवाहिकेअभावी मैदानातच मृत्यू

आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत दिनेश बाना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. त्यामुळे आताच्या घडीलाही तो बढती मिळाल्यावर मोठी खेळी करण्यात सक्षम असल्याचे मत त्याचे कोच रनवीर जाखड़ यांनी बोलून दाखवले. फलंदाजीशिवाय विकेटमागची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. तो 8 से 9 तास प्रॅक्टिस करुन इथपर्यंत पोहचला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com