esakal | पंत हा तर डावखुरा सेहवाग; पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केलं कौतुक

बोलून बातमी शोधा

पंत हा तर डावखुरा सेहवाग; पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केलं कौतुक}

भारताचा विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत याचं पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हक यानं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

पंत हा तर डावखुरा सेहवाग; पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केलं कौतुक
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारताचा विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत याचं पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हक यानं तोंडभरुन कौतुक केलं आहे. नजीकच्या काळात पंतएवढा गुणवान फलंदाज आपण पाहिलेला नाही. तो डाव्या हाताने फलंदाजी करणारा विरेंद्र सेहवाग आहे, दडपणाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, असेही इंझमामने म्हटले. 
 
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतय संघ अडचणीत आलेला असताना ऋषभ पंत यानं विस्फोटक शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. पंतची ती खेळी पाहून इंझमाम भारावून गेला. पंतला फलंदाजी करताना पाहताना सेहवाग डाव्या हाताने फलंदाजी करत असल्याचा भास होतो. विशेष म्हणजे समोर कशी परिस्थिती आहे, याचा त्याला फरक पडत नाही. कोणतेही दडपण न घेता अशी आक्रमक फलंदाज पाहिल्याचे आपल्याला आठवत नाही, असे इंझमाम म्हणाला. 

सहा फलंदाज १४६ धावांत बाद झालेले असताना पंत याने त्याच्या स्टाईलमध्ये फलंदाजी सुरु केली. खेळपत्ती कशी आहे, प्रतिस्पर्धी संघाने किती धावा केल्या आहेत, याचा पंतच्या फलंदाजीवर काहीही परिणाम दिसत नव्हता. जेवढ्या ताकदीनं त्याने फिरकीचा सामना केला, तेवढ्याच आक्रमकपणे वेगवान गोलंदाजीवरही वर्चस्व गाजवले, अशा शब्दात इंझमामने पंतचे कौतुक केलं. 

पंत आणि सेहवाग यांच्या फलंदाजीची तुलना करताना इंझमाम म्हणतो, या दोघांवर परिस्थितीचा परिणाम होत नाही. मी सेहवागबरोबर खेळलो आहे. त्यामुळे परिस्थिती कठीण असली, तरी तो कशाप्रकारे बिनधास्तपणे फलंदाजी करतो, हे अनुभवले आहे. खेळपट्टी कशीही असली, तरी तो गोलंदाजांवर तुटून पडायचा.