WTC Final अखेरचा सामना, किवी खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final अखेरचा सामना, किवी खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा

WTC Final अखेरचा सामना, किवी खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा

ICC World Test Championship Final: इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा न्यूझीलंडच्या यष्टीरक्षकानं केली आहे. भारत (Indian Cricket Team) आणि न्यूझीलंड (New Zealand national cricket team) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवण्यात येणार आहे. साउथ हॅम्पटनच्या रोज बाउलच्या क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल खेळवली जाईल. 18 ते 22 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा बादशहा कोण? याचे उत्तर मिळणार आहे. भारतीय संघाने 72.2 टक्के विनिंग पर्सेटेजसह फायनलमध्ये प्रवेश केला असून न्यूझीलंड 70 टक्के विनिंग पर्सेंटेजस क्वालिफाय झाले आहे.

नूझीलंड संघाचा यष्टीरक्षक बीजे वाटलिंग यानं आज, बुधवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. पुढील महिन्यात इंग्लंड येथे होणाऱ्या अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होणार असल्याचं त्यानं सांगितलं. अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या दोन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. दक्षिण अफ्रीकामध्ये जन्मलेल्या बीजे वाटलिंगनं निवृत्तीची घोषणा केली आहे. बीजे वाटलिंग म्हणाला की, 'निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. न्यूझीलंडसाठी खेळणं माझ्यासाठी सन्मानची बाब आहे. खासकरुन कसोटी संघात स्थान मिळणं. कसोटी सामना क्रिकेटमधील सर्वात महत्वाचा घटक आहे. न्यूझीलंड संघाकडून क्रिकेट खेळणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी मोठ-मोठ्या क्रिकेटपटूबरोबर खेळलो, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. न्यूझीलंड संघात मला चांगले मित्रही मिळाले. माझ्या प्रवासात सोबत देणाऱ्या सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद '

हेही वाचा: WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

35 वर्षीय वाटलिंग यानं न्यूझीलंडच्या विजयात नेहमी महत्वाची भूमिका बजवाली आहे. 2009 मध्ये सलामी फलंदाज आणि कामचलाऊ यष्टीरक्षक म्हणून करियरची सुरुवात केली होती. 2013 मध्ये ब्रँडन मॅक्कुलमनं निवृत्ती घेतल्यानंतर वाटलिंग न्यूझीलंड कसोटी संघाचा नियमीत यष्टीरक्षक झाला. वाटलिंगने आतापर्यत 73 कसोटीत 38.11 च्या सरासरीनं 3773 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान 8 शतक आणि 19 अर्धशतक झळकावली आहेत. यष्टीमागे 257 जणांना बाद करण्याचा विक्रमही त्यानं केलाय.

Web Title: Watling To Retire After World Test Championship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top