WBBL हरमनप्रीतने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harmanpreet Kaur
WBBL हरमनप्रीतने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय

WBBL हरमनप्रीतने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय

भारतीय महिला टी 20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवलीये. हरमनप्रीतने यंदाच्या हंगामात अष्टपैलू कामगिरी केली आहे. तिच्या या लक्षवेधी कामगिरीमुळे ती प्लेयर ऑफ टून्रामेंटची मानकरी ठरली. एखाद्या भारतीय खेळाडूनं बीबीएल स्पर्धा गाजवण्याची ही पहिलीच वेळ आहे.ऑस्ट्रेलियन लीगमधील पुरस्कार मिळाल्यानंतर हरमनप्रितने आयपीएलसंदर्भात मोठा आशावाद व्यक्त केला. महिलांचे आयपीएलही लवकरच सुरु होईल, असे तिने म्हटले आहे.

मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना हरमनप्रीत कौरने 399 Oebexmu 15 विकेट घेतल्या. या स्पर्धेत तिने तीन वेळा प्लेयर ऑफ मॅचची मानकरी ठरली. 3-2-1 वोटिंग सिस्टमने तिने बेथ मूनी आणि सोफी डिव्हाइन यांना प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीतून बाहेर काढले. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध लीगमध्ये आपला ठसा उमटवणारी हरमनप्रीत कौर तिसरी परदेशी खेळाडू आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइन आणि एमी सँटरवेट यांनी हा पराक्रम करुन दाखवला होता.

हेही वाचा: IPL 2022 auction : RCB या 4 खेळाडूंना रिटेन करेल, चोप्रांचा अंदाज

महिला बिग बॅश लीग स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. 27 नोव्हेंबरला या स्पर्धेतील फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. पर्थ स्कॉचर्स पहिला संघ आहे की ज्यांनी फायनलचे तिकीट बूक केले आहे. बुधवारी ब्रिसबेन हीट आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यात एलिमेटर सामना रंगणार आहे. यांच्यातील विजेता संघ 25 नोव्हेंबरला मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध खेळेल. या सामन्याच्या निकालानंतर दुसरा फायनलिस्ट पक्का होईल.

loading image
go to top