IPL 2022 auction : RCB या 4 खेळाडूंना रिटेन करेल, चोप्रांचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022
IPL 2022 auction : RCB या 4 खेळाडूंना रिटेन करेल, चोप्रांचा अंदाज

IPL 2022 auction : RCB या 4 खेळाडूंना रिटेन करेल, चोप्रांचा अंदाज

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? याची चर्चा सध्या जोर धरत आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा यांनी Royal Challengers Bangalore (RCB) च्या ताफ्यात कोणत्या खेळाडूंना प्राधान्याने पसंती मिळेल, याचा अंदाज वर्तवला आहे. इंडियन प्रिमियर लीग (IPL 2022) साठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. सध्याच्या आठ संघासह दोन नवे संघ आगामी हंगामात खेळताना दिसतील. सध्याच्या 8 संघ चार खेळाडूंना रिटेन करु शकतात.

आकाश चोप्रा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आरसीबीच्या ताफ्यात कोणत्या खेळाडूंना कायम ठेवण्यात येईल, याविषयची अंदाज बांधला. विराट कोहली, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडीक्कल या चौघांना आरसीबी कायम ठेवले, असे मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे. आकाश चोप्रा यांनी पर्पल कॅप विजेत्या हर्षल पटेलकडे कानाडोळा केल्याचे दिसते. आयपीएलच्या गत हंगामात IPL 30 वर्षीय गोलंदाजाने 15 सामन्यात 32 विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा: सिंधू ‘बीडब्ल्यूएफ’ ॲथलीट आयोगाची निवडणूक लढवणार

विराट कोहली आणि युजवेंद्र चहल ही माझी पहिली पसंती आहे. यात आणखी दोघांची नावे समावेश करताना मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कलला स्थान देईन, असे आकाश चोप्रा यांनी म्हटलंय. रॉयल चॅलेंजर्स संघ या चौघांना संघात कायम ठेवू शकतो, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मागील हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलऐवजी सिराजला पसंती देण्यामागचे कारणही आकाश चोप्रा यांनी स्पष्ट केल आहे. मोहम्मद सिराज हा हर्षल पटेलपेक्षा अधिक काळा खेळेल, असा तर्क त्यांना लावला आहे. दुसरीकडे मॅक्सवेलमध्ये सातत्याचा अभाव असल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय. त्यामुळेच त्याला रिटेन करण्याची रिस्क RCB घेणार नाही, असे आकाश चोप्रा यांना वाटते.

हेही वाचा: कोरोनानंतर भारतात प्रथमच बहुराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

loading image
go to top