Wrestling
Wrestlingsakal

Wrestling News: बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांची ‘दुहेरी कुस्ती'; म्हणे आम्ही चाचणीच्या विरोधात नव्हतो!

आव्हान देणाऱ्या ज्युनियर कुस्तीपटूंबाबत दुःख आणि आनंदही

नवी दिल्ली - आशिया क्रीडा स्पर्धेत संघात थेट प्रवेश देण्यावरून देशातील नवोदित मल्लांनी आम्हाला न्यायालयात उभे केले याचे एकीकडे दुःख झाले, पण हेच नवोदित मल्ल आपल्या हक्कासाठी लढत आहेत हे पाहून आनंदही झाला, असे मत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी व्यक्त केले.

पुढील महिन्यात हाँगझाऊ येथे होणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या हंगामी समितीने १८ विभागांसाठी निवड चाचणी घेतली, त्यात ६५ किलो पुरुष आणि ५३ किलो महिला या विभागाचाही समावेश होता; मात्र या गटातील अनुक्रमे बजरंग पुनिया आणि विनेश यांना चाचणीविना थेट प्रवेश दिला.

Wrestling
Sport News : सात्विक-चिराग यांनी घेतली जागतिक बॅडमिंटन दुहेरीत दुसऱ्या स्थानावर प्रथमच झेप

हंगामी समितीच्या या निर्णयाविरोधात अंतिम पंघाल आणि सुजीत कलकाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली. बजरंग आणि विनेश दोघेही परदेशात सराव करत आहेत आणि तेथून त्यांनी एकीकडे ‘आसू’ आणि दुसरीकडे ‘हसू’ असे दुहेरी मतप्रदर्शन केले.

आम्ही चाचणीच्या विरोधात नव्हतो, आम्ही अंतिमला दोष देणार नाही, ती चुकीची नव्हती ती तिच्या हक्कासाठी लढत होती; तर आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देत होतो. ती लहान आहे, त्यामुळे तिला इतक्या लवकर या प्रकरणातील गुंतागुंत कळणार नाही, त्यामुळे आम्हीही चुकीचे नव्हतो, असे विनेश म्हणाली.

Wrestling
Shiv Chhatrapati Sports Awards : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात नाशिकचा ‘षटकार’; राज्य सरकारतर्फे घोषणा

आम्ही सिस्टीमच्या विरोधात लढत आहोत. ही सिस्टीम फार बलवान आहे, जेव्हा आम्ही प्रहार झेलत होतो तेव्हा कोणीच पुढे आले नाही, अशीही भावना विनेशने व्यक्त केली.अंतिमला जर तिला फसवले आहे असे वाटत होते, तर तिने त्याच वेळेस न्यायालयात जायला हवे होते.

अखेरच्या क्षणी न्यायालयात गेल्यामुळे आम्हाला दुःख झाले. पण लहान वयातच या कुस्तीगीरांना आपल्या हक्कांची जाणीव झाली आहे आणि ते लढा देण्यास तयार होत आहे, हे भारतीय कुस्तीसाठी सुचिन्ह आहे असे विनेश म्हणते.

या प्रकरणावर मी नंतर सविस्तरपणे बोलणार आहे. तीन चे चार मल्ल विनेशला सहज पराभूत करू शकतात असे अंतिम म्हणाली आहे, परंतु मला तिला सांगायचे आहे, विनेश अजून कोणाकडूनही पराभूत झालेली नाही आणि होणारही नाही. २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी तू पहिली भारतीय महिला आहेस असे सांगत असशील तर विनेशनेही दोन जागतिक पदके मिळवलेली आहेत. तू आमच्याविरोधात न्यायालयात जायला नको होतीस, असे बजरंगने सांगितले.

Wrestling
Nashik Sports: भारतीय जम्परोप संघात नाशिकचे चौघे! जागतिक जम्परोप अजिंक्यपदासाठी संघ अमेरिकेला रवाना

तो पुढे म्हणतो, आम्ही २० वर्षे कुस्तीत घालवली आहेत, आम्ही आंदोलन करत असल्यामुळे कुस्तीच्या सरावापासून दूर आहोत, असे तुझे म्हणणे आहे, पण सर्वोत्तम कामगिरी करण्याची आमची भूक कायम आहे, कारकिर्दीच्या उच्च पातळीवर असताना आम्ही तसूभरही मेहनत आणि प्रयत्न कमी केले नव्हते.

...तर बजरंग, विनेशची माघार?

हांगझाऊ येथे होणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांची चाचणीशिवाय निवड झालेली असली, तरी आगामी जागतिक स्पर्धेच्या चाचणीत त्यांचा पराभव झाला तर ते आशिया स्पर्धेतील संघातून माघार घेऊ शकतात, अशी शक्यता भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या हंगामी समितीतील एका सदस्याने व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com