esakal | संसर्गाच्या भीतीमुळे नकार; बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

संसर्गाच्या भीतीमुळे नकार; बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांचे स्पष्टीकरण

संसर्गाच्या भीतीमुळे नकार; बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे भारतीयांनी इंग्लंडविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. त्यांच्या निर्णयात आयपीएलचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे.

भारतीय प्रशिक्षकांच्या टीममध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. अगोदरच तिघे जण अलगीकरणात आणि एक जण विलगीकरणात होता. त्यातच अंतिम कसोटी सामना सुरू होण्याच्या अगोदर सहाय्यक फिजिओ परमारला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे आणि त्याच्या संपर्कात सर्वच खेळाडू आल्यामुळे भारतीय खेळाडूंचे धाबे दणाणले होते.

खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला; त्यात त्यांचा दोष नव्हता. मुख्य फिजिओनंतर खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेण्यासाठी योगेश परमार हा एकमेव पर्याय होता आणि त्याला लागण झाल्यामुळे खेळाडूंसमोर चिंतेचे वातावण निर्माण झाले होते. प्रत्येकाने कोरोना चाचणी केली असली आणि त्या क्षणी निगेटिव्ह आली असली, तरी भीती कायम होती, असे गांगुली यांनी सांगितले.

पाचव्या कसोटीस तंदुरुस्त राहण्यासाठी परमार खेळाडूंना मसाज देत होता तो प्रत्येकाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याच्याद्वारे आपल्यालाही संसर्ग झाल्याची भीती खेळाडूंना वाटत होती, असे सांगून गांगुली म्हणाले, ‘‘सातत्याने जैवसुरक्षा वातावरणात राहणे कठीण आहे. भारतीय खेळाडू गेले अनेक महिने हा अडथळा पार करत आहेत आणि सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शनही करत आहेत, अशा वेळी त्यांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे.’’

बीसीसीआय हे जबाबदार क्रिकेट मंडळ आहे आणि आम्ही इतर मंडळांचाही तेवढाच आदर राखतो, असे सांगताना गांगुली यांनी रद्द झालेल्या या सामन्याची पुढील वर्षी एक कसोटी सामना खेळून भरपाई केली जाईल, असे सूतोवाच केले.

`पाचवा` कसोटी सामना

पुढील वर्षी या कसोटीची भरपाई करण्याचा विचार आहे, परंतु त्या सामन्याला एकमेव कसोटीचा दर्जा नसून तो रद्द करण्यात आलेला पाचवा सामना म्हणून खेळवला जाईल, असे गांगुली यांनी सांगितले.

loading image
go to top