कोहली-स्मिथचा रेकॉर्ड धोक्यात, जो रुटचे किवींविरुद्ध आणखी एक शतक

जो रूटने विराट कोहली, स्टीव्ह स्मिथच्या वेगवान कसोटी शतकाच्या विक्रमाशी केली बरोबरी
Joe Root 27th Test Century
Joe Root 27th Test Century

Joe Root 27th Test Century: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जो रूटने बॅक टू बॅक सेंच्युरी करत इंग्लंड टीमला मजबूत स्थिती आणले आहे. न्यूझीलंडच्या 553 धावांच्या प्रत्युत्तरात देताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 5 गडी गमावून 473 धावा केल्या आहेत. रुट 25 चौकारांच्या मदतीने नाबाद 163 धावावर खेळत आहे. रूटशिवाय ऑली पोपनेही शतक झळकावले, तो 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 145 धावांची खेळी करत आऊट झाला.

Joe Root 27th Test Century
दुहेरी सुवर्णपदक विजेते हरिचंद यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ 27-27 शतक केले आहे. रूटने त्याच्या या शतकासह रूटने बरोबरी केली आहे. रुटचे हे 119 व्या सामन्यातील 27 वे शतक आहे. इंग्लंडचा हा माजी कर्णधार गेल्या काही दिवसांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. रूटचा फॉर्म पाहता या मालिकेत कोहली आणि स्मिथचा रेकॉर्ड धोक्यात आला आहे.

Joe Root 27th Test Century
'मी सचिननंतर मलिकची वाट पाहतोय' सुनील गावसकर असं का म्हणाले?

जो रूटने या वर्ष आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतके केले आहे. रूटने या काळात दोन द्विशतकेही झळकावली आणि 6 वेळा 150 धावांचा टप्पा पार केला आहे. दुसर्‍या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ न्यूझीलंड संघापेक्षा फक्त 80 धावांनी मागे आहे. जो रूट आणि ऑली पोपच्या शतकांमुळे इंग्लंड संघाने सामन्यात आपले स्थान मजबूत केले. न्यूझीलंडने पहिल्या डावात 553 धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशी इंग्लंडने 250-300 धावांची आघाडी घेतल्यास सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे, अन्यथा सामना अनिर्णितकडे जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com