esakal | IPL 2021 : परदेशी खेळाडू आमची जबाबदारी; BCCI चे भावनिक पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

IPL

IPL 2021 : परदेशी खेळाडू आमची जबाबदारी; BCCI चे भावनिक पत्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus) दिवसागणिक वाढत आहे. कोरानाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या भितीपोटी ऑस्ट्रेलियाने मंगळवारी भारतातून येणाऱ्या फ्लाईट्स 15 मे पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसोबतच या स्पर्धेतून माघार घेतलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू अडचणीत सापडले आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंना त्यांच्या मायदेशी सुरक्षित पोहचवण्याची आमची जबाबदारी आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

बीसीसीआयचे हंगामी CEO हेमांग अमीन यांनी खेळाडूंना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात लिहिलंय की, "स्पर्धा संपल्यानंतर मायदेशी कसे जाणार? ही चिंता खेळाडूंना सतावत आहे. तुमच्या मनात (परदेशी खेळाडू) असणाऱ्या प्रश्नाची आम्हाला कल्पना आहे. आम्ही तुम्हाला विश्वास देतो की, या गोष्टीची चिंता करण्याची काहीच गरज नाही. जोपर्यंत स्पर्धेत सहभागी झालेला परदेशी खेळाडू सुरक्षित घरी पोहचत नाहीत तोपर्यंत ही स्पर्धा पूर्ण होणार नाही, अशा शब्दांत बीसीसीआयने खेळाडूंना सुरक्षित आपापल्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्याचा विश्वास दिला आहे.

हेही वाचा: IPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा!

परदेशी खेळाडूंना कोणत्याही अडचणीशिवाय सुरक्षित घरी पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बीसीसीआय सद्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. स्पर्धा संपल्यानंतर परदेशी खेळाडूंना सुरक्षित मायदेशी पोहचवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहोत, असेही बीसीसीआयने आपल्या पत्रात म्हटले आहे. कठिण परिस्थितीत थोड्या वेळासाठी का होईना स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना आनंदी क्षण देण्याच्या इराद्याने खेळाडू स्पर्धेत उतरले आहेत. त्यांची ही भूमिका कौतुकास्पद आहे, असा उल्लेखही अमीन यांनी लिहिलेल्या पत्रातून करण्यात आलाय. मोठ्या धैर्याने मैदानात उतरणारे खेळाडू लाखो लोकांमध्ये उमेद निर्माण करत आहेत, असेही पत्रात म्हटले आहे. जर तुम्ही एका मिनिटासाठी जरी एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणत असाल तर ते एक चांगले काम असते. तुम्ही व्यावसायिक खेळाडू असून जिंकण्यासाठी मैदानात उतरत असला तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी तुम्ही मोठे काम करत आहात, असा उल्लेख त्यांनी खेळाडूंना उद्देशून केलाय.

loading image