INDvsSA : आज मोहालीत कोणता 'पाऊस' पडणार; हा आहे अंदाज

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेत दुसरा सामना आज मोहाली येथे होणार आहे. पहिला सामना वाया गेल्याने सर्व चाहत्यांचे लक्ष मोहलीच्या हवामानावर लागले आहे. अशातच चाहत्यांसाठी एक खूशखबर आली आहे. ​

मोहली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेत दुसरा सामना आज मोहाली येथे होणार आहे. पहिला सामना वाया गेल्याने सर्व चाहत्यांचे लक्ष मोहलीच्या हवामानावर लागले आहे. अशातच चाहत्यांसाठी एक खूशखबर आली आहे. 

Breaking : टोकीयो ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटू विनेश फोगट पात्र

आज होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली नाही. सध्याकाळी सात वाजता हा सुरु होणार असून त्यावेळी मोहालीचे तापमान 28 ते 31 डिग्री असू शकते. दरम्यान मॅच सुरू असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास 5 टक्के किंवा 10 टक्के पावसाची शक्यता आहे.

दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली ट्‌वेंटी-20 लढत पावसामुळे वाया गेली; पण याचे कवित्व संपण्यास तयार नाही. जोरदार पावसापेक्षा लढत रद्द होण्यासाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटकांना जबाबदार धरले जात आहे. त्यांनी इंद्रू नागाला प्रसन्न केले नाही; त्यामुळे लढतीला इंद्रू नागाचा डंख बसल्याचा आरोप होत आहे. 

U19 Asia Cup गाजविणाऱ्या अर्थवची मुंबईच्या संघात एण्ट्री

धर्मशालामधील आंतरराष्ट्रीय लढत पावसामुळे वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी धर्मशालातील इंद्रू नागदेवतेची पूजा करीत असत. ही देवता पावसावर नियंत्रण राखते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. हिमाचल प्रदेश संघटनेचे पदाधिकारी त्यासाठी या देवतेची यापूर्वी पूजा करीत असत; पण या वेळी या देवतेला प्रसन्न करण्यात आले नाही आणि त्यामुळे लढत वाया गेली असल्याची चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weather Forecast for 2nd T20 between India vs South Africa