World Cup 2019 : सेमी फायनल कोण जिंकणार? भारत, न्यूझीलंड की पाऊस?

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर आजही पावसाचे सावट आहे. सोमवारपर्यंत मॅंचेस्टरमध्ये पावसाचा अंदाज नव्हता. मात्र आज हवामानाने रंग बदलले आहेत. आजच्या सामनात पावसाची सतत ये-जा राहणार आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर आजही पावसाचे सावट आहे. सोमवारपर्यंत मॅंचेस्टरमध्ये पावसाचा अंदाज नव्हता. मात्र आज हवामानाने रंग बदलले आहेत. आजच्या सामनात पावसाची सतत ये-जा राहणार आहे. 

सध्या मॅंचेस्टरमध्ये पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने आज 40 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज पूर्ण दिवस कमाल तापमान 20 अंश राहील तर हवामानात 75 टक्के आर्द्रता असेल. 

मात्र, आजच्या सामन्यात पाऊस पडला तरी उद्या राखीव दिवस असल्याने उद्या सामना होऊ शकतो. उद्याच्या सामन्यातही पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तरीही भारतच अंतिम फेरीत स्थान मिळवेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weather forecaste for IND vs NZ semi final