भारताविरुद्धच्या मालिकेतून विंडीजच्या स्फोटक खेळाडूची माघार

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

रसेल सध्या कॅनडा टी-20 लीग खेळत आहे. तेथे त्याला गुडघा दुखापतीने त्रास दिला. याच दुखापतीमुळे तो विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही उत्तरार्धात खेळू शकला नव्हता.

फ्लोरिडा : भारताविरुद्धच्या पहिला ट्वेन्टी-20 सामना काही तासांवर आलेला असताना वेस्ट इंडीजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सर्वाधिक स्फोटक फलंदाज असा लौकिक असलेल्या आंद्रे रसेलने ट्वेन्टी-20 मालिकेतून स्वतःहून माघार घेतली आहे. 

रसेल सध्या कॅनडा टी-20 लीग खेळत आहे. तेथे त्याला गुडघा दुखापतीने त्रास दिला. याच दुखापतीमुळे तो विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही उत्तरार्धात खेळू शकला नव्हता.

रसेलची स्फोटक फलंदाजी यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांनी अनुभवलेली आहे. सध्या तर तो गोलंदाजीतही चमक दाखवत होता. त्याच्या उसळत्या चेंडूसमोर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाजीची दाणादाण उडाली होती. त्यामुळे भारताविरुदधच्या टी-20 मालिकेत तो वेस्ट इंडीजसाठी महतावाचा खेळाडू होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies all rounder Andre Russell not play agianst India in T20 series