T20 World Cup : म्हणे, कॅरेबियन ताफा टीम इंडियापेक्षा भारी!

वेस्ट इंडिजच्या संघात अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. मोठी फटकेबाजी करुन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता वेस्ट इंडिजच्या संघात आहे.
West Indies Cricket Team
West Indies Cricket Team Twitter

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएई (UAE) आणि (Oman) च्या मैदानात रंगणार असल्याचे आयसीसीने (ICC) स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत टीम इंडियासोबतच वेस्ट इंडिजचा संघ प्रबळ दावेदार असेल, असे मत भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक सबा करीम यांनी व्यक्त केले आहे. वेस्टइंडिज संघाने आतापर्यंत दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे ते देखील प्रबळ दावेदारीच्या शर्यतीत असतील असे साबा करीम यांना वाटते. वर्ल्ड कप संदर्भातील अंदाज वर्तवताना त्यांनी टीम इंडियाला दुसरा दावेदार मानले. भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल असून भारतीय संघ यंदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकू शकतो, असे ते म्हणाले.

सबा करीम यांनी इंडिया न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये वर्ल्ड कप संदर्भात आपला अंदाज व्यक्त केला. ते म्हणाले की, सध्याच्या घडीला वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार संघामध्ये वेस्ट इंडिजला पहिला क्रमांक देईन. माझ्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या संघात अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. मोठी फटकेबाजी करुन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता वेस्ट इंडिजच्या संघात आहे. भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल असून टीम इंडियाही टी-20 वर्ल्ड कपमधील प्रबळ दावेदारापैकी एक आहे, असेही ते म्हणाले.

West Indies Cricket Team
ऑलिम्पिकमधून नाओमी करणार कमबॅक; फेडरर-जोकोविचही खेळणार

या दोन संघाशिवाय इंग्लंडच्या संघातही विश्वजेता बनण्याची धमक असल्याचे साबा करीम यांनी म्हटलंय. इंग्लंडचा संघ आयसीसीच्या टी-20 रँकिगमध्ये अव्वलस्थानी आहे. हा संघ देखील प्रबळ दावेदारांच्या शर्यतीत असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. इंग्लंडच्या संघाने व्हाईट बॉलवर खेळताना कमालीची रणनिती आखलीये. हा संघही संतुलित दिसतो. त्यांनाही टी-20 वर्ल्ड कप उंचावण्याची संधी आहे.

West Indies Cricket Team
Wimbledon 2021 : बेथानीच्या साथीनं सानियाची विजयी सलामी

वेस्ट इंडिजचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील गतविजेता आहे. 2016 मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी बाजी मारली होती. त्यानंतर 5 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. भारतामध्ये होणारी स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएई आणि ओमनमध्ये पार पडणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आयपीएलमधील उर्वरित सामने युएईच्या मैदानातच रंगणार आहेत. भारतीय संघाला याचा कितपत फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com