INDvsWI : कसोटीसाठी सर्वांत अनुभवी फलंदाज? आम्हाला नाही गरज

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विंडीजने त्यांचा सर्वांत अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला संघात स्थान दिेले नाही. विंडीजने शुक्रवारी कसोटी मालिकेसाठी त्याचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला. 

गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विंडीजने त्यांचा सर्वांत अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला संघात स्थान दिेले नाही. विंडीजने शुक्रवारी कसोटी मालिकेसाठी त्याचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला. 

विंडीजने कसोटी संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. राहकीम कॉर्नवॉल आणि शामार्ह ब्रुक्स यांना कसोची क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्यापूर्वी एक कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता त्याची इच्छा अपूर्ण राहणार आहे.  

भारताच्या विंडीज दौऱ्यात संघाने यापूर्वी ट्वेंटी20 मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला आहे. तर एकदिवसीय मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. 

वेस्ट इंडिजचा संघ :
जेन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, राहकीम कॉर्नवॉल, शेन डॉवरीच, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शेय होप, किमो पॉल, केमार रोच.

भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, महंमद शमी, जसप्रित बुमरा, उमेश यादव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies declare test squad for series against India