WI vs IND : किंग्जची झुंजार खेळी थॉमसने नेली तडीस; आवेशचा एक नो बॉल पडला महागात

West Indies Defeat India In 2nd T20I Match Brandon King Devon Thomas Shine Avesh Khan No Ball Cost India
West Indies Defeat India In 2nd T20I Match Brandon King Devon Thomas Shine Avesh Khan No Ball Cost India esakal

WI vs IND 2nd T20I : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजने भारताचा 5 विकेट्सनी पराभव करत मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आणली. भारताने विंडीजसमोर 139 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान विंडीजने 19.2 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. विंडीजकडून ब्रँडन किंगने सर्वाधिक 68 धावा केल्या तर मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत डेव्हॉन थॉमसने 19 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. विंडीजकडून गोलंदाजी ओबेड मॅकॉयने भेदक मारा करत भारताचे 17 धावात सहा फलंदाज टिपले. (West Indies Defeat India In 2nd T20I Match Brandon King Devon Thomas Shine Avesh Khan No Ball Cost India)

West Indies Defeat India In 2nd T20I Match Brandon King Devon Thomas Shine Avesh Khan No Ball Cost India
Commonwealth Games : वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदरने भारताला मिळवून दिले कांस्य

भारताने विजयासाठी ठेवेल्या 139 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने दमदार सुरूवात केली कायल मायेर्स आणि ब्रँडन किंगने पॉवर प्लेमध्ये 46 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी हार्दिक पांड्याने तोडली. त्याने मायेर्सला 8 धावांवर बाद केले.

त्यानंतर सलामीवीर किंगने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान अश्विनने कर्णधार निकोलस पूरनला 14 धावांवर बाद करत विंडीजला दुसरा धक्का दिला. पाठोपाठ रविंद्र जडेजाने शिमरॉन हेटमायरला 6 धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला. मात्र अर्धशतक पूर्ण करणाऱ्या किंगने विंडीजला 15 व्या षटकात शतक पूर्ण करून दिले.

मात्र आवेश खानने किंगचा 68 धावावर त्रिफळा उडवून देत विंडीजला बॉल टू रन चेस करताना मोठा धक्का दिला. यामुळे विंडीजच्या धावगतीला थोडासा ब्रेक लागला. सामना 12 चेंडूत विजयासाठी 16 धावा असा आला होता. त्यावेळी 19 वे षटक टाकणाऱ्या अर्शदीप सिंगने पॉवलेचा 5 धावांवर त्रिफळा उडवला. तसेच षटकात फक्त 6 धावा देत सामना शेवटच्या षटकात 10 धावा असा आणला.

मात्र शेवटच्या षटकातील पहिलाच चेंडू आवेश खानने नो बॉल टाकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर थॉमसने षटकार मारत सामना जवळ आणला. विजयासाठी 5 चेंडूत 2 धावांची गरज असताना थॉमसने चौकार मारत सामना संपवला.

West Indies Defeat India In 2nd T20I Match Brandon King Devon Thomas Shine Avesh Khan No Ball Cost India
Commonwealth Games 2022 : ज्यूदो डबल धमाका! सुशिला देवीची रूपेरी तर विजय कुमारची कांस्य कमाई

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या भारतीय फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर रविंद्र जडेजाने 24 आणि ऋषभ पंतने 24 धावांचे योगदान दिले.

मात्र वेस्ट इंडीजच्या ओबेड मॅकॉयने भेदक मारा करत भारताचे 17 धावात सहा फलंदाज टिपले. त्याला जेसन होल्डरने 2 तर अल्झारी जोसेफ आणि अकिल हुसैनने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. त्यामुळे भारताचा डाव 138 धावात संपुष्टात आला. भारताची ही वेस्ट इंडीजमधील टी 20 क्रिकेट मधील सर्वात कमी धावसंख्या ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com